Girish Bapat Passed Away : संघ स्वयंसेवक, नगरसेवक ते खासदार! फोटो अल्बममधून पाहा गिरीश बापटांचा राजकीय प्रवास

Girish Bapat unseen photos : पुण्यातील स्थानिक राजकारणात दबदबा असणारे गिरीश बापट आज आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांचा राजकीय प्रवास हा अनेकांना थक्क करणारा आहे...  

Mar 29, 2023, 13:32 PM IST

Girish Bapat unseen photos : राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले नेते गिरीश बापट आज आपल्यामध्ये नाही. आज प्रत्येक जण एकच म्हणतोय पुण्याच्या राजकारणातला चाणक्य आज गेला. तब्बल चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.  

1/10

पुण्याच्या राजकारणात 'भाऊ' म्हणून त्यांची ओळख. गिरीश बापट यांचा जन्म  3 सप्टेंबर 1950 रोजी पुण्यात झाला. बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतली.  

2/10

गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक...नरसेवकपदापासून गिरीश बापट 1995 पासून सलग पाच वेळा आमदार झाले. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसेच्या मोहन जोशी यांना पराभव करत त्यांनी लोकसभेत एन्ट्री घेतली. 

3/10

 बापट 1973 मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून कामाला लागते. त्यांनी कामगारांच्या मागण्यांसाठी अनेकदा लढा दिला होता. त्यावेळी दोन वर्षांच्या काळात आणीबाणीमध्ये बापट 19 महिन्यांसाठी नाशिक जेलमध्ये होते.

4/10

1983 मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक पदी विराजमान झाले . सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद आपल्याकडे ठेवले. विशेष म्हणजे सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट यांनी महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचं अध्यक्ष मिळवलं. 

5/10

1995 मध्ये आमदारकीची निवडणूक लढविली अन्‌ पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळा निवडून आले. 1996 साली त्यांना भाजपाने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण बापट यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले.

6/10

त्यांना पुण्याच्या राजकारणात 'सर्वसमावेशक' राजकारणासाठी ओळखलं जायाचं. विरोधी पक्षाची सत्ता असली तरी आपले काम साधून घेण्याचे कसब त्यांचाकडे होतं. 

7/10

ते अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्यांमुळे गोत्यात आले. तरुणाईला संबोधताना 'हिरवा देठ' हे त्यांचं वक्तव्य चांगलेच गाजलं होतं. 

8/10

 कट्ट्यावर बसून गप्पांचा फड रंगविण्याची त्यांची हातोटी होती. त्यामुळे त्यांना पुण्यातील आणि राजकारण्यातील बित्तंबातमी माहिती असायची.

9/10

 एकदा उत्साहाच्या भरात 'चल म्हटली की लगेच चालली' असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर एकच चर्चा रंगली होती. 

10/10

हा सर्वसमावेशकपणा हेच गिरीश बापट यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य होते आणि चाळीस वर्षांच्या यशस्वी राजकीय कारकीर्दीचे रहस्य होतं.