Goa News : पार्टीचा विचारच सोडा... गोव्यात नवा नियम लागू, सरकारनं उचलली कठोर पावलं

Goa News : पार्टीसाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गोव्यात राज्य शासनानं अतिशय मोठा निर्णय घेतल्यामुळं याचे थेट परिणाम Party Culturte वर होताना दिसणार आहेत. 

Mar 14, 2023, 12:45 PM IST

Goa News : सुट्टीसाठी कुठे जायचं? असा प्रश्न विचारल्यावर डोक्यात येणारं पहिलं ठिकाण असतं, गोवा. देशविदेशातील पर्यटकांची वर्षभर गर्दी असणाऱ्या या गोव्याची आणखी एक ओळख म्हणजे पार्टी हब. मनसोक्त कल्ला करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला इथं मिळतं. पण, याच गोव्याचं चित्र येत्या काळात पालटणार आहे. 

1/6

Goa news

Goa news ban imposed on outdoor music after 10 PM after stat governemnt cm pramod sawants decision

गोव्यात यापुढं मोकळ्या परिसरात रात्री 10 वाजल्यानंतर मोठ्या आवाजात गाणी, म्युझिक सिस्टीम लावण्यावर बंदी असेल. खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबतचे आदेश दिले. 

2/6

Goa party places

Goa news ban imposed on outdoor music after 10 PM after stat governemnt cm pramod sawants decision

गोव्यातील किनारपट्टी भागात रात्री 10 नंतर मोकळ्या जागेत म्युझिक लावण्यावर बंदीचे आदेश दिले आहेत. 

3/6

Goa best hotels

Goa news ban imposed on outdoor music after 10 PM after stat governemnt cm pramod sawants decision

सदरील आदेशांचं पालन न केल्यास रेस्तराँ, शॅक्स, कॉटेज आणि इतर पार्टी आयोजकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. 

4/6

Goa best beaches

Goa news ban imposed on outdoor music after 10 PM after stat governemnt cm pramod sawants decision

या महत्त्वाच्या निर्णयानंतर सावंत यांनी पोलीसांशी बैठकही घेतली. येत्या दिवसांत परीक्षांचा काळ पाहता हा निर्णय घेतल्याचं शासनाकडून सांगण्यात येत आहे.   

5/6

Goa news in marathi

Goa news ban imposed on outdoor music after 10 PM after stat governemnt cm pramod sawants decision

गोव्यात फक्त खुल्या परिसरात होणाऱ्या पार्टीवरच बंदी घालण्यात आली आगे. इनडोअर पार्टी आणि क्लब्सना हा नियम लागू नसेल. स्थानिकांच्या अनेक तक्रारींनंतर हा निर्णय घेतला गेला

6/6

Goa

Goa news ban imposed on outdoor music after 10 PM after stat governemnt cm pramod sawants decision

पर्यटनावरच गोव्याची अर्थव्यवस्था अवलंबून असली तरीही राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गरजांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.