Google चे कर्मचारी अत्याचाराविरोधात एकवटले; बनवली युनियन

Jan 05, 2021, 12:30 PM IST
1/5

Google च्या कर्मचाऱ्यांची यूनियन

Google च्या कर्मचाऱ्यांची यूनियन

Google कर्मचाऱ्यां यूनियन ही कर्मचाऱ्यांचे पगार, नोकरीतील सुविधा आणि चांगल्या वातावरणासाठी काम करणार आहे. या युनियनमध्ये आतापर्यंत २२५ हून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अमेरिकेतील टेक इंडस्ट्रीत असं पहिल्यांदा झालं आहे. असं म्हटलं जातं की, कंपनी इथे युनियन बनवण्याची परवानगी देत नाही. यामुळे गुगलच्या कर्मचाऱ्यांनी ही युनियन अतिशय गुप्तपणे बनवली आहे. डिसेंबर महिन्यात यातील नेत्याच्या पदाकरता निवडणूक घेतली जाणार आहे. 

2/5

शोषण विरोधात आवाज

शोषण विरोधात आवाज

न्यूज एजन्सी रॉयटर्सनुसार , या युनियनच्या एका नेत्याने सोमवारी New York Time मध्ये आपला लेख लिहून साऱ्या गोष्टी मांडल्या. युनियनच्या लेखात लिहिलं आहे की, अल्फाबेट वर्कर्स युनियनचा उद्देश निश्चित करणं आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याचे शोषण होऊ नयेत तसेच कुणाचाही भेदभाव केला जाऊ नये असे वाटते.

3/5

Google वर लावले गंभीर आरोप

Google वर लावले गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील श्रम संस्थेने Google वर आरोप लावले की, कंपनी कर्मचाऱ्यांशी गैरपद्धतीने चौकशी करत आहेत. याविरोधात अनेकांनी निदर्शन केले आहेत. आणि एक युनियन बनवून आपला मुद्दा समोर ठेवला गेला. मात्र या विरोधात त्यांना कामावरून काढण्यात आलं. 

4/5

Google ने आरोपांवर दिलं प्रत्युत्तर

Google ने आरोपांवर दिलं प्रत्युत्तर

या आरोपांवर उत्तर देताना Google चं म्हणणं आहे की, केलेले सर्व आरोप अवैध आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारे कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. गुगलची पीपल्स ऑपरेशनची संचालक कारा स्लवरस्टीन यांनी म्हटलं की, "आमची कंपनी कायमच कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करतो.'

5/5

Google मध्ये अत्याचाराचा मोठा मुद्दा

Google मध्ये अत्याचाराचा मोठा मुद्दा

Google मध्ये कर्मचाऱ्यांचा पगार हा मोठा मुद्दा नाही. कारण येथील कर्मचाऱ्यांना चांगला पगार दिला जातो. मात्र येथे कर्मचाऱ्यांसोबत होणार राजकारण आणि वैचारिक मतभेद यामुळे वादाचा मुद्दा उभा राहिला आहे. येथे होणारा अत्याचार आणि भेदभाव असं वातावरण आहे.