कॉस्ट कटिंग करणाऱ्यांनाच कंपनीने दाखवला बाहरेचा रस्ता; गुगलचा शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ

गेल्या वर्षी जगात मंदीचे सावट असताना मोठ्या मोठ्या दिग्गज कंपन्यांनी बऱ्याच प्रमाणात कर्मचारी कपात केली होती. बऱ्याच दिवसांपासून कर्मचारी कपातीच्या बातम्यांना विराम मिळाला होता. मात्र आता एका बड्या कंपनीने पुन्हा एकदा मोठी कर्मचारी कपात केली आहे.

Sep 14, 2023, 16:20 PM IST

आता पुन्हा एकदा लेऑफशी संबंधित बातमी आली आहे आणि ती जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिन गुगलशी संबंधित आहे. 

1/7

नोकरी देणाऱ्यांनाच काढले नोकरीवरुन

google who gave jobs were removed from their jobs

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या वेळी कंपनीने त्या कर्मचाऱ्यांना नोकरीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे, जे कंपनीसाठी भरती करायचे. गुगलने पुन्हा शेकडो नोकरांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे.

2/7

Alphabet Inc मधून कर्मचाऱ्यांना नारळ

Alphabet Inc lay off

न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीनुसार,गुगलची मूळ कंपनी Alphabet Inc ने आपल्या जागतिक रिक्रूटर्स टीममधून शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

3/7

कर्मचारी कपात करणारी सर्वात मोठी कंपनी

google largest company to cut staff

त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात अजूनही कर्मचारी कपातीची प्रक्रिया सुरू आहे. यावेळी शेकडो कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकणारी गुगल ही पहिली मोठी कंपनी ठरली आहे.

4/7

बुधवारी जाहीर केला मोठा निर्णय

big decision was announced by google

गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने बुधवारी आपल्या जागतिक भरती संघातील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय जाहीर केला.

5/7

अल्फाबेट कंपनीने दिलं स्पष्टीकरण

Alphabet company explained

मात्र, ही घोषणा करताना कंपनीने हेही स्पष्ट केले आहे की, या नोकरदारांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय हा कंपनीतील मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीचा भाग नाही.

6/7

कामावरून कमी केल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदतीचे आश्वासन

Assurance of relief to laid off employees

याशिवाय विभागाच्या संपूर्ण टीमला या छाटणीचा फटका बसणार नाही आणि ज्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा दरवाजा दाखवला जात आहे, त्यांनाही कंपनी मदत करेल, असेही सांगण्यात आले.

7/7

कंपनीला आता कमी लोकांची गरज

company needs less people now

वृत्तानुसार, गुगलचे प्रवक्ते कोर्टने मेन्सिनी यांनी या ताज्या कपातीबाबत म्हटले आहे की, कंपनीला आता कमी लोकांची गरज आहे, त्यामुळे टीमचा आकार कमी करण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.