पुढच्या वर्षापासून पासवर्डचा त्रास संपणार... जाणून घ्या कसा?

Google password : गुगलने आता पासवर्ड ही संकल्पना संपल्याची घोषणा केली आहे. Google ने पासवर्डचे युग संपणार असल्याचे म्हटलं आहे. कारण जागतिक पासवर्ड डेच्या दिवशीच गुगलने 'पासकीज' हे खास फिचर आणले आहे. यामुळे आता वेगवेगळे पासवर्ड तयार करण्यापासून स्वातंत्र्य मिळणार आहे.

May 10, 2023, 19:52 PM IST
1/6

google password

या प्रकल्पावर Google, Apple आणि Microsoft हे तिघेही एकत्र काम करत आहेत. हे तिन्ही दिग्गज फास्ट आयडेंटिटी ऑनलाइन (FIDO अलायन्स) नावाच्या प्रोग्राम अंतर्गत पासकीजवर संयुक्तपणे काम करत आहेत. 2013 मध्ये हा प्रोग्राम सुरू करण्यात आला होता आणि त्याचा उद्देश लोकांच्या पासवर्डची समस्या संपवणे हा होता. हे फिचर क्रॉस प्लॅटफॉर्मवरही काम करू शकणार आहे.

2/6

Phone password

आता आपण प्रत्येक वेबसाइट आणि अॅपसाठी वेगवेगळे पासवर्ड ठेवतो. पण नवीन पद्धतीत तुमच्या फोनचा पासवर्ड हा प्रत्येक खात्याचा पासवर्ड असेल.  

3/6

screen lock

म्हणजेच स्क्रीन लॉक, फिंगरप्रिंट लॉक किंवा फेस अनलॉक हे एकच पासवर्ड म्हणून काम करतील. जर तुम्ही फक्त नंबरचा पासवर्ड वापरत असाल तर तोच पासवर्ड सगळीकडे लागू होणार आहे. जसे की 1234, हा एकच सार्वत्रिक पासवर्ड असेल. 

4/6

google crome

गुगल गेल्या काही वर्षांपासून आपल्या क्रोम आणि अँड्रॉइड या प्लॅटफॉर्मवर या तंत्रज्ञानाची चाचणी करत आहे. Kayak, PayPal, Shopify सारख्या प्लॅटफॉर्मने त्याचा वापर केला आहे. यासोबतच याहू जपाननेही यासाठी एक यंत्रणा तयार केली आहे.  

5/6

Password expired

पासवर्ड कालबाह्य होणार नाही, पण पासवर्ड निश्चितपणे कालबाह्य होतील. गुगलच्या म्हणण्यानुसार, हे फीचर गुगल यूजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. आता जरी हे ऐच्छिक असले तरी, पण भविष्यात त्याचा वापर करावा लागणार आहे. 

6/6

Multi factor authentication

दरम्यान, पासवर्डमुळे सुरक्षिततेचा धोका नेहमीच राहतो. कमकुवत पासवर्ड किंवा अनेक ठिकाणी तोच पासवर्ड वापरणे हे याचे कारण असू शकते. अशा परिस्थितीत, युजर्सची ओळख सुनिश्चित करण्यासाठी मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशनपेक्षा काहीही चांगले नाही.