दिवसाला 50 अन् महिन्याला गुंतवा 1500; पोस्टाच्या 'या' स्किममध्ये मॅच्युरिटीवर मिळवा 35 लाख

Jul 13, 2023, 17:15 PM IST
1/8

indian post

पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव ग्राम सुरक्षा योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला सरकारकडून पूर्ण 35 लाख रुपये मिळतात. ही योजना इंडिया पोस्टने ग्राहकांसाठी सुरू केली होती.

2/8

Gram Suraksha Yojana Good return

ही संरक्षण योजना असा एक पर्याय आहे ज्यामध्ये तुम्हाला कमी जोखमीसह चांगला परतावा मिळू शकतो. या योजनेत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा करावे लागतील.

3/8

gram suraksha yojana 2023

जर तुम्ही या योजनेत नियमितपणे गुंतवणूक केली तर काही वर्षांनी तुम्हाला 31 ते 35 लाख रुपये मिळू शकतात.

4/8

Gram Suraksha Yojana Investment

एखाद्या व्यक्तीने वयाच्या 19 व्या वर्षी ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतली, तर त्याचा मासिक प्रीमियम 55 वर्षांसाठी 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. 

5/8

Gram Suraksha Yojana money

त्यानंतर पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि मॅच्युरिटीवर 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मिळतील.

6/8

Gram Suraksha Yojana age group

19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

7/8

Gram Suraksha Yojana payment

या योजनेसाठी प्रीमियम पेमेंट हे मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आहे. या योजनेवर तुम्ही कर्जही घेऊ शकता. तसेच ही योजना घेतल्यानंतर 3 वर्षांनी तुम्ही सरेंडर देखील करू शकता.  

8/8

withdraw money even before maturity

शेतकऱ्यांसाठी ही एक जबरदस्त योजना आहे, ज्यामध्ये दररोज 50 रुपयांची बचत करून आणि महिन्यातून एकदा 1500 रुपये जमा करून, तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षी 35 लाख रुपये मिळवू शकता. काही परिस्थितीत, लोक गरजेच्या वेळीही मुदतपूर्तीपूर्वीही पैसे काढू शकता. (सर्व फोटो - PTI)