आधी सर्दी, खोकला होतो आणि मग थेट नसांवर आघात करतो; एकदम भयानक GBS रोग

व्हायरल इन्फेक्शनसारखाच वाटणारा एक रोग सध्या पसरतोय. याची लक्षणे सर्दी खोकल्यासारखी असतात. 

Aug 27, 2023, 16:30 PM IST

GBS Disease :  सर्दी खोकला, किंवा व्हायरल इन्फेक्शन झाल  असेल तर अंगावर काढू नका. कारण सध्या मुंबईत गुलियन बारे सिंड्रोम अर्थात जीबीएसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढलेत. जीबीएसची लक्षणं ही व्हायरल इन्फेक्शनसारखीच असतात, त्यामुळे दुर्लक्ष करु नका. हा रोग थेट थरीरातल्या नसांवर आघात करतो.

1/7

सर्दी खोकल्याचा, व्हायरल इन्फेक्शनचा आजार बरा होत नसेल तर गाफील राहू नका.  वेळीच डॉक्टर गाठा आणि सल्ला घ्या.. कारण जेवढं अंगावर काढाल तेवढा हा आजार तीव्र होतो आणि त्यावरचे उपचारही महागडे आहेत. 

2/7

जीबीएस या आजारात तुमच्या शरीरातला प्रतिकारशक्ती व्हायरसवर हल्ला करण्याऐवजी चुकून तुमच्या नसांवरच हल्ला करते.

3/7

वेळीच उपचार झाले नाहीत तर जीबीएसमुळे तुमच्या डोक्यावरही परिणाम होऊ शकतो. 

4/7

प्रचंड थकवा येतो. आजार जास्त वाढल्यास श्वास घ्यायला त्रास होतो अशी या रोगाची लक्षणं आहेत. 

5/7

चालताना, बोलताना अडथळे येणं गिळायला त्रास होतो. 

6/7

हातापायाला मुंग्या येणं, बधीर होणं स्नायू कमजोर होतात. 

7/7

या आजारात सुरुवातीला तुमचे पाय दुखायला लागतात त्यानंतर हाताच्या नसा कमजोर होतात.