Hair Wash Rules : विवाहित महिलांनी कोणत्या दिवशी चुकूनही केस धुवू नये? नाहीतर...

Hair Wash Rules : हिंदू धर्मात तरुणी आणि विवाहित महिलांसाठी काही नियम सांगितले आहेत. त्यामधील एक नियम म्हणजे विवाहित महिलांनी कधी केस धुवावेत याबद्दल. चुकीच्या दिवशी केस धुतल्यास तुम्हाला संकटाचा सामना करावा लागू शकतो. 

Dec 02, 2023, 11:24 AM IST
1/8

सोमवार

शास्त्रानुसार विवाहित महिलांनी सोमवारी केस चुकूनही धुवू नका. त्याशिवाय ज्या महिल्यांच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती अशुभ असेल त्यांनीही सोमवारी केस धुवू नयेत. 

2/8

मंगळवार

विवाहित महिलेने मंगळवारीही केसं धुणं योग्य मानलं जातं. मंगळवारी केस धुतल्यामुळे घरात नकारात्मकता वाढते.   

3/8

बुधवार

या दिवशी विवाहित महिलांनी केस धुवू शकता. मात्र अविवाहित मुलींनी केस धुवू नका. खास करुन ज्या महिलांना लहान भावंडं असेल त्यांनी केस धुणं टाळा.   

4/8

गुरुवार

लग्न झालेल्या महिलांनी गुरुवारी केस कधीही धुवू नका. शास्त्रात असं म्हटलं गेलं आहे की, एखाद्या विवाहित स्त्रीने गुरुवारी केस धुतले तर त्यामुळे तिच्या पतीचं वय कमी होतं. मात्र जर तुम्हाला गुरुवारी केस धुवावे लागले तर बेसनात थोडी हळद मिसळा आणि हे मिश्रण केसांना लावा मग धुवा. तसंच गुरुवारी पुरुषांनीही केस धुवू नयेत. गुरुवार हा गुरु ग्रहाचा असल्याने या दिवशी केस धुतल्यास आर्थिक संकट कोसळतं.   

5/8

शुक्रवार

केस धुण्यासाठी शुक्रवार हा अत्यंत शुभ मानला जातो. शुक्रवारी केस धुतल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

6/8

शनिवार

महिलांनी शनिवारी कधीही केस धुवू नयेत. असे केल्याने शनिदेव नाराज होतात असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. तरी तुम्हाला शनिवारी केस धुवायचे असतील तर केसांना कच्चे दूध लावून केस धुवा असं उपाय सांगण्यात आला आहे.  

7/8

रविवार

 केस रविवारी देखील धुणं योग्य मानलं जात नाही तरीही सुट्टीचा दिवस असल्याने अनेक महिला रविवारीच केस धुतात, अशावेळी दूध पाण्यात मिसळून केस धुवा. 

8/8

एकादशी, अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी केस कापू नका किंवा धुवू नका. उपवासाच्या एक दिवस आधी केस स्वच्छ करा, पण जर तुम्हाला उपवासाच्या दिवशी केस धुवायचे असतील किंवा आवश्यक असेल तर कच्चे दूध पाण्यात मिसळून केस धुवा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)