बर्थ डे स्पेशल - ऋतिक रोशनचा 'कूल डॅडी' अंदाज

Jan 10, 2018, 12:44 PM IST
1/8

ऋतिक रोशनचा आज 44 वा वाढदिवस  आहे. उत्तम अभिनेत्यासोबत तो एक डान्सरही आहे. 2000साली सुजैन खानसोबत ऋतिक विवाहबद्ध झाला. त्यानंतर त्यांंच्या आयुष्यात रिहान आणि रिधान यांंचं आगमन झालं.  

2/8

ऋतिक आणि सुजैन ही बॉलिवूडची आदर्श जोडी होती. मात्र 2013 साली ते एकमेकांपासून दूर झाले. पुढील वर्षभरात त्यांनी घटस्फोट घेतला.  

3/8

ऋतिक मुलांसोबत अनेकदा 'क्वॉलिटी टाईम' घालवतो. सोशल मीडियावरही तो मुलांसोबतचे फोटो शेअर करतो. सुजैन आणि मुलांंसोबत अनेकदा तो डिनरसाठी बाहेर जातो. 

4/8

घटस्फ़ोटानंतरही सुजैन आणि ऋतिक मुलांंसाठी एकत्र येतात. सहलीला जातात. ऋतिक  अनेकदा काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल राखताना दिसला आहे. 

5/8

ऋतिक आणि कंगणा रणावतच्या वादानंतर ऋतिकचे कुटुंब आणि एक्स पत्नी सुजैनही पाठीशी उभी होती. 

6/8

ऋतिकच्या करियरची सुरूवात 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून झाली. राकेश रोशन दिग्दर्शित या चित्रपटाने त्याचा यशस्वी डेब्यू झाला.  

7/8

लवकरच ऋतिक 'सुपर 30' या चित्रपटामध्ये झळकणार आहे.  

8/8

ऋतिकचा आगामी चित्रपट आनंद कुमारांच्या जीवनावर आधारित आहे.