रोहित शर्मामुळे हार्दिक पांड्या होणार नाही टीम इंडियाचा कॅप्टन? मग् हिटमॅनचा उत्तराधिकारी कोण?

Captain of Team India : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-ट्वेंटी फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे आता हिटमॅनचा उत्तराधिकारी कोण? असा सवाल विचारला जात आहे. झिम्बॉब्वे दौऱ्यात युवा शुभमन गिलच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली होती. अशातच आता श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाची कमान कोणाच्या खांद्यावर असेल? यावर बीसीसीआय चिंतीत आहे.

| Jul 18, 2024, 16:12 PM IST
1/5

बीसीसीआय

झिम्बॉब्वे दौऱ्यात युवा शुभमन गिलच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली होती. अशातच आता श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाची कमान कोणाच्या खांद्यावर असेल? यावर बीसीसीआय चिंतीत आहे.

2/5

उत्तराधिकारी कोण?

रोहितच्या उत्तराधिकारी कोण? यावर बीसीसीआयने सखोल चर्चा केली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि माजी कर्णधार रोहित शर्मा यांचा सल्ला घेतला आहे.

3/5

टीम इंडियाचा कर्णधार

दोघांनी सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद सोपवण्याबाबत चर्चा केली होती, म्हणजेच रोहितमुळे आता हार्दिक टीम इंडियाचा कर्णधार बनू शकणार नाही, असा अर्थ काढला जातोय.

4/5

सूर्यकुमार यादव

रोहित शर्मा आणि गौतम गंभीरने सूर्यकुमार यादवचं नाव सुचवल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपर्यंत सूर्या टीम इंडियाची कॅप्टन्सी सांभाळू शकतो.

5/5

वनडेची कॅप्टन्सी

दरम्यान, श्रीलंका दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादवकडे टी-ट्वेंटीची जबाबदारी दिली तरी वनडेची कॅप्टन्सीची रोहित शर्माकडे असणार आहे.