अतिप्रमाणात लिची खाताय? आत्ताच सावध व्हा; ही दुखणी मागे लागू शकतात

लिची हे सर्वांच्या आवडीचे फळ आहे. मात्र, अतिप्रमाणात लिचीचे सेवन करणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरु शकते. कारण जाणून घ्या 

| Jun 17, 2023, 19:47 PM IST

लिची हे सर्वांच्या आवडीचे फळ आहे. मात्र, अतिप्रमाणात लिचीचे सेवन करणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरु शकते. कारण जाणून घ्या 

1/5

अतिप्रमाणात लिची खाताय? आत्ताच सावध व्हा; ही दुखणी मागे लागू शकतात

health tips disadvantages of eating litchi

गरमीच्या दिवसांत लिची खाणं सगळ्यानांच आवडतं. लिची शरीरासाठी फायदेशीर आहे. कारण लिचीमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते. मात्र, लिचीचे प्रमाणापेक्षा अधिक सेवन केल्यास शरीराला अपायही होऊ शकतात त्यामुळं तुमची तब्येत बिघडू शकते. लिची जास्त प्रमाणात खाल्ल्याने काय नुकसान होतं? हे जाणून घेऊया. 

2/5

लठ्ठपणा

health tips disadvantages of eating litchi

लिचीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळं रोज प्रमाणापेक्षा जास्त लिची खाल्ल्यास लठ्ठपणा वाढू शकतो. तसंच, तुमच्या पोटाची चरबीदेखील वाढू शकते. त्यामुळं प्रमाणातच लिची खावी

3/5

विषबाधा

 health tips disadvantages of eating litchi

जास्त प्रमाणात लिची खाल्ल्याने फूड पॉइजनिंग होण्याची शक्यता असते. तसंच, अनेकदा पोटही बिघडू शकते. 

4/5

शस्त्रक्रिया असल्यास टाळा

  health tips disadvantages of eating litchi

तुमची जर शस्त्रक्रिया होणार असेल तर तीन आठवडे आधी लिची खआणं बंद करा. कारण लिची खाल्ल्याने मधुमेहाचा त्रास वाढू शकतो आणि मग त्यावर नियंत्रण मिळवणे कठिण होते. 

5/5

लो बीपी

 health tips disadvantages of eating litchi

तुम्हाला लो बीपीचा त्रास असेल तर लिची प्रमाणातच खा. कारण अतिप्रमाणात लिची खाल्ल्याने तुम्हाला ब्लड प्रेशरबरोबरच अन्य दुखणीही मागे लागू शकतात.