सूर्य नारायण आग ओकतोय; उष्माघाताची लक्षणे

राज्यात सूर्य नारायण आग ओकतच आहे. त्यामुळे उन्हाची काहिली काही केल्या कमी होण्याची चिन्हं नाहीत. विदर्भात तापमान खूपच जास्त आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. उष्माघाताने मृत्यूंची देखील नोंद झाली आहे. पुढील काही दिवस राज्यात उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. यामुळे योग्य ती खबरदारी घेवून नागिरीकांना स्वत:चा उन्हापासून बचाव करावा.

May 14, 2023, 23:30 PM IST

Heat Wave Symptoms : राज्यात सूर्य नारायण आग ओकतच आहे. त्यामुळे उन्हाची काहिली काही केल्या कमी होण्याची चिन्हं नाहीत. विदर्भात तापमान खूपच जास्त आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. उष्माघाताने मृत्यूंची देखील नोंद झाली आहे. पुढील काही दिवस राज्यात उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. यामुळे योग्य ती खबरदारी घेवून नागिरीकांना स्वत:चा उन्हापासून बचाव करावा.

1/8

कधी कधी उष्माघाताचा त्रास इतका वाढतो की शरीराचे तापमान वाढले तरी घाम येत नाही. 

2/8

हृदयाचे ठोके वाढू शकतात. 

3/8

उकाड्यामुळे त्वचेशी निगडीत समस्या निर्माण होवू शकतात. अंगाची लाही लाही होवून पुरळ येवू शकतात. 

4/8

उकाड्यामुळे उलट्या आणि मळमळ याचा त्रास होवू शकतो. 

5/8

शरीराचे तापमान अनियंत्रीत होऊ शकते. यामुळे कडाक्याच्या उन्हात घराबाहेर पडणे टाळा.

6/8

उन्हाळ्यात शरीरात पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी भरपूर पाणी प्या. 

7/8

डोकेदुखीची समस्या निर्णाम होऊ शकते. 

8/8

गर्मीमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. परिणामी तुमचे मानसिक संतुलन देखील बिघडू शकते.