Heeraben Modi: हीराबेन पंतप्रधान मोदींसोबत मंचावर का नव्हत्या येत? कारण...
PM Modi's mother Heeraben Modi Passes Away: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हीराबेन यांचं शुक्रवारी, 30 डिसेंबर रोजी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून गांधीनगरमध्ये अंतिम संस्कार केले.
1/5
2/5
18 जूनच्या ब्लॉगमध्ये पीएम मोदी यांनी लिहिलं होतं की, "आज जेव्हा लोक आईकडे जातात आणि विचारतात की तुमचा मुलगा पंतप्रधान आहे, तेव्हा तुम्हाला अभिमान वाटतो. त्यावर आईनं उत्तर दिलं होतं की, तुम्हाला होतो तितकाच अभिमान मला वाटतो. मी काहीच केलं नाही, फक्त निमित्त मात्र आहे. माझी आई माझ्यासोबत कोणत्याही सरकारी किंवा सार्वजनिक कार्यक्रमात येत नाही. फक्त दोनदा तीने माझ्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली होती."
3/5
पंतप्रधानांनी सांगितले होते की, "एकता यात्रेत श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावून मी परत आलो होतो, तेव्हा अहमदाबादमध्ये झालेल्या नागरी सन्मान कार्यक्रमात माझी आई स्टेजवर आली आणि माझं औक्षण केलं. हा खूप भावनिक क्षण होता. एकता यात्रेत फगवाड्यात हल्ला झाला होता, त्यात काही लोक मारले गेले होते. त्यावेळी आईला माझी खूप काळजी वाटत होती."
4/5
5/5