भरपूर मायलेज, खर्चही कमी, 'या' आहेत 10 लाखांपेक्षाही स्वस्त CNG कार

जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चांगले मायलेज, कमी किंमत असणारी कार कोणाला आवडत नाही? जर तुम्हीही चांगले मायलेज आणि स्वस्त CNG कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या 5 कार पाहू शकता. जाणून घ्या सविस्तर

Jul 17, 2024, 15:55 PM IST
1/6

2024 Tata Altroz

Tata Altroz ​​ही पाच सीटर कार आहे. या कारची एक्स-शोरुम किंमत 6.65 ते 10.99 लाखांपर्यंत आहे. ही कार तुम्हाला 26.20 किमी प्रति किलो CNG मायलेज देऊ शकते.

2/6

Maruti Suzuki Alto K10 CNG

Maruti Suzuki Alto K10 CNG ही सर्वात स्वस्त कार आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.73 लाख रुपयांपासून सुरू होते. Alto K10 CNG कार प्रति किलो CNG 33.85 किमी पर्यंत मायलेज देऊ शकते असा दावा मारुती सुझुकीने केला आहे.

3/6

Maruti Suzuki WagonR CNG

भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी WagonR एक आहे. ही कार CNG मध्ये देखील येते. WagonR CNG ची एक्स-शोरूम किंमत 6.44 लाख रुपयांपासून सुरू होते. ही CNG कार तुम्हाला 34.05 किमी प्रति किलो सीएनजी मायलेज देते.

4/6

Hyundai Grand i10 Nios

Hyundai Grand i10 Nios देखील CNG पर्यायासह खरेदी करता येते. i10 Nios च्या CNG कारची एक्स-शोरूम किंमत 7.68 लाख रुपये आहे. या सीएनजी कारसह तुम्ही अंदाजे 25.61 किमी प्रति किलो सीएनजी मायलेजचा आनंद घेऊ शकता.

5/6

Maruti Suzuki S-Presso

ही कार देखील स्वस्त CNG कार आहे. CNG मध्ये ही कार 32.73 किमी प्रति किलो CNG मायलेज देऊ शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत ही 5.91 लाख रुपयांपासून सुरू होते. 

6/6

Tata Tiago iCNG

टाटा मोटर्सच्या CNG कारमध्ये आयसीएनजी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. Tata Tiago CNG कारची  एक्स-शोरूम किंमत 8.29 लाख रुपयांपासून सुरु आहे. ही कार तुम्हाला 26.47 किमी प्रति किलो CNG मायलेज देऊ शकते.