'या' खासदारानं हॉलिवूडच्या 'स्पायडर मॅन 3'साठी केलेलं काम; क्षणात वेधलं लक्ष

भोजपुरी चित्रपटसृष्टीमध्ये दमदार अभिनयानं आपली ओळख तयार करणारे अभिनेते म्हणून ओळख असणाऱ्या रवी किशन यांचा जन्म 17 जुलै 1969 मध्ये उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात झाला.   

Jul 17, 2024, 13:09 PM IST
1/7

प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी रवी किशन यांना आपण सर्वचजण ओळखतो. भोजपुरी सिनेमापासून ते बॉलिवूडपर्यंत त्यांने आपल्या अभिनयाने एक नवी ओळख निर्माण केली. पण तुम्हाला हे माहित आहे का त्यांनी हॉलिवूड चित्रपट 'स्पायडर मॅन 3' साठीसुद्धा काम केले आहे.  

2/7

2007 मध्ये हॉलिवूड सुपरस्टार टोबे मॅग्वायर स्टारर चित्रपट 'स्पायडर मॅन 3' प्रदर्शित झाला. स्पायडर मॅन हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांमध्ये  लोकप्रिय झाला आणि या चित्रपटाने यशाचं शिखर गाठलं. या चित्रपटामुळे अभिनेते रवी किशन चर्चेचा भाग ठरले. 

3/7

मॅग्वायरचे इंग्रजी आणि हिंदी चित्रपटां व्यतिरिक्त स्पायडर-मॅन 3 हा देखील भोजपुरी भाषेत डब करण्यात आला. त्यावेळी हॉलिवूड चित्रपट पहिल्यांदाच भोजपुरी भाषेत सादर करण्यात आला.   

4/7

भोजपुरी भाषेत डबिंगसाठी अभिनेता रवी किशनने स्पायडरमॅनच्या पीटर पार्कर या भूमिकेसाठी आपला दमदार आवाज देत चित्रपट अनोख्या अंदाजात सादर केला.    

5/7

अशा प्रकारे पडद्यामागे काम करत त्यांनी स्पायडर मॅन 3 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.त्याचबरोबर तेरे नाम, लक, गिरफ्त यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करत अभिनय क्षेत्राला सुरूवात केली.

6/7

याव्यतिरिक्त रवी किशनने वेब सिरीजमध्ये देखील ओळख मिळवली. वाढत्या ओटीटीच्या ट्रेंडमध्ये रंगबाज, हंसमुख, खाकी-द बिहार चॅप्टर आणि मामला लिगल है यांसारख्या अनेक वेब सिरीजमधून चाहत्यांची मने जिंकली.  

7/7

याशिवाय हनुमान या पौराणिक टीव्ही मालिकांमध्ये भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारली तर रिॲलिटी शो बिग बॉस सीझन 1 मध्ये देखील स्पर्धक म्हणून दिसून  आले होते.