गंगेच्या किनाऱ्यावर रमला हॉलिवूड अभिनेता....

Apr 07, 2019, 12:47 PM IST
1/7

भारत, विविधतेने नटलेला देश म्हणून साऱ्या जगात या देशाची ओळख आहे. अशा या देशाच्या संस्कृती आणि परंपरांविषयीसुद्धा अनेकांच्याच मनात कुतूहल आहे. फक्त भारतातच नव्हे तर, भारताबाहेर थेट हॉलिवूडपर्यंतही हे वेड पाहायला मिळालं आहे. विविध राष्ट्रांतील राजकारणी म्हणू नका किंवा इतर देशांच्या कलाविश्वातील काही प्रसिद्ध चेहरे म्हणू नका. प्रत्येकजण भारतात येऊन येथील वातावरणात स्वत:च्याच अंतर्मनाचा ठाव घेत असतो. लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ यालाही भारताची अशीच भुरळ पडली आहे. विलचे काही फोटो पाहूनच याचा सहज अंदाज लावता येत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम) 

2/7

भारत दौऱ्यावर असणाऱ्या विलने हरिद्वारला भेट दिली असून, येथे त्याने गंगा आरती, तपश्चर्या, ध्यानसाधनेचं महत्त्वं जाणून घेतलं. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम) 

3/7

असंख्य भारतीयांना पवित्र आणि पूजनी. स्थानी असणाऱ्या गंगा नदीच्या पात्राच्या किनारी विल रमला आणि त्या संपूर्ण वातावरणाशी एकरुप झाला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम) 

4/7

मुळात या भारतभेटीत इथली विविधरंगी संस्कृती, व्यक्ती, त्यांचे स्वभाव या साऱ्यांममुळे स्वत:चीच आकलनशक्ती वाढली असून, स्वत:विषयी, आपल्याला अवगत असणाऱ्या कलेविषयी आणि या विश्वाविषयीच्या काही गोष्टी नव्याने लक्षात आल्याचं त्याने म्हटलं आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम) 

5/7

या दौऱ्यात विलने अनेकांशीच संवाद साधत, वेगळं नातं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मुळात भारतातही त्याची प्रचंड लोकप्रियता असल्यामुळे विललाही स्थानिकांचं अमाप प्रेम मिळालं यात दुमत नाही. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम) 

6/7

भारतात रमलेल्या या हॉलिवूड अभिनेत्याचा हा अंदाज पाहून पवित्र गंगा नदीच्या किनारी गंगा आरतीच्या भक्तीमय वातावरणाचा एकदा तरी अनुभव घ्यावा अशीच इच्छा अनेकांच्या मनात घर करत असावी. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम) 

7/7

(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)