Horoscope 2025 : कामांना खोडा! नवीन वर्षाची सुरुवात 'या' राशींसाठी बिकट; प्रचंड आर्थिक नुकसानासह अडचणीत वाढ

Horoscope 2025 : नवीन वर्ष कसं असेल हे प्रत्येकाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार येणारं नवीन वर्ष 2025 हे तीन राशींच्या लोकांसाठी प्रचंड आर्थिक नुकसानासह अडचणीत वाढ करणारं ठरणार आहे. त्यामुळे त्यांनी आतापासून काळजी घ्यावी. 

| Dec 25, 2024, 12:24 PM IST
1/7

ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रह हा ऊर्जा, धैर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो. मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हणून ओळख आहे. 

2/7

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ दर 45 दिवसांनी आपली राशी बदलत असतो. 2025 मध्ये तो आपली राशी 7 वेळा बदलणार आहे. ज्याचा परिणाम 12 ही राशींवर कमी जास्त प्रमाणात होणार आहे. 

3/7

काहीसाठी तो शुभ ठरणार आहे. पण 3 राशींच्या लोकांसाठी नवीन वर्ष हे आव्हानात्मक असणार आहे.   

4/7

मंगळाच्या राशी बदलामुळे कोणत्या राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात अडचणी येणार आहेत, जाणून घ्यात. 

5/7

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी मंगळाचा राशी बदल संमिश्र असणार आहे. 2025 मध्ये तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. या वर्षी तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष केल्याने आजारी पडण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकतात. कर्ज घेणेही या वर्षी हानिकारक ठरेल. नवविवाहित लोकांच्या आयुष्यात तणाव वाढू शकतो. घरातील वडिलधाऱ्यांशीही मतभेद होणार आहेत. व्यापाऱ्यांना अपेक्षेप्रमाणे फायदा होणार नाही. तुमचा आत्मविश्वास कमी होणार आहे. 

6/7

धनु रास

या राशीच्या लोकांसाठी, मंगळाच्या राशीतील बदलामुळे आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात अडचणी येणार आहेत. जे लोक आधीच कर्जबाजारी आहेत ते वेळेवर परतफेड करू शकणार नाहीत. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस वाटणार नाही आणि त्यांचा आत्मविश्वासही कमी होऊ शकतो. तरुणांना मित्रांसोबतच्या भांडणामुळे कायदेशीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरी बदलण्याचा निर्णयही यावेळी योग्य ठरणार नाही. तुम्हाला कोणत्याही कामात अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते.

7/7

मकर रास

या राशीच्या लोकांनी 2025 मध्ये मंगळाच्या संक्रमणापासून सावध राहावे लागणार आहे. तुमच्यासाठी हा काळ नातेसंबंध आणि करिअरमध्ये तणाव आणू शकतो. अविवाहित लोकांचे लग्न होण्याची शक्यता कमी असते आणि जे रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांनाही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरदार लोकांचे त्यांच्या बॉसशी भांडण होऊ शकतं, ज्यामुळे त्यांची नोकरी गमावण्याचा धोका असेल. कला आणि संगीताशी संबंधित लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकते. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार नाहीत, ज्यामुळे त्यांचे परीक्षेचे निकाल खराब होऊ शकतात. या काळात तुमचे चालू असलेले काम बिघडू शकतं. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)