कोणत्या पदार्थासाठी किती लीटर पाणी लागते

प्रत्येक गोष्टीसाठी किती पाणी लागते याबाबतची अभ्यासपूर्ण माहिती या वॉटर गॅलरीतील विविध मॉडेल व चार्ट्सच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली आहे.

May 14, 2019, 16:09 PM IST

अमर काणे, नागपूर : पाण्याची तीव्र टंचाई, त्यामुळे अन्नस्त्रोतांची अनुपलब्धता यासर्व बाबी समोर येतात. मुळात दुष्काळाची परिस्थीत निर्माण होण्याकरता मानवचं जबाबदार आहे. नियोजना अभावी,पाणी वापरताना निष्काळजीपणामुळे मानवाला अशा परिस्थितीला समोरे जावे लागत आहे. त्यामुळे पाणी वापरताना कोणती काळजी घ्यावी हे काहीसं दाखवण्याचा प्रयत्न नागपुरातील रामन विज्ञान केंद्रातील वॉटर गॅलरीच्या माध्यमातून. मानवी शरीरातील पाण्यापासून ते  नद्यांच्या रचना त्या कशा वाहतात अगदी भूगर्भातील जलस्त्रोतापर्यंत इत्थंभूत माहिती या व़ॉटर गॅलरीच्या माध्यमातून  सादर करण्यात आली आहे.

1/4

बच्चेकंपनी आणि मोठ्यांच्या आवडतीचा पदार्थ म्हणजे चॉकलेट. एक किलो चॉकलेटसाठी तब्बल २४ हजार ली़टर पाणी लागते. 

2/4

एक किलो नारळासाठी २ हजार ५०० लीटर पाणी लागते. 

3/4

आपल्या रोजच्या वापरात समावेश असलेल्या एक किलो साखरे साठी तब्बल १ हजार ५०० लीटर पाणी लागते. 

4/4

चिकन आणि मटन बनवण्यासाठी देखील अधिक पाणी लागते. एक किलो चिकन साठी तीन हजार ९०० लीटर पाणी लागते. तर एक किलो मटन बनबण्यासाठी १३ हजार ५०० लीटर पाणी लागते.