Space Food: अंतराळात एस्ट्रोनॉट्सना किती वेळा लागते भूक? कसं बनवतात जेवण?

Space Food: जेव्हा कोणी अंतराळात जातो तेव्हा तो खाण्याच्या बाबतीत सर्व गोष्टींची दक्षता घेतो. अशा परिस्थितीत, हा प्रश्न तुमच्या मनात कधी आला आहे की स्पेसमध्ये गेल्यानंतर एस्ट्रोनॉट्स किती वेळा खातात?

| Jul 24, 2024, 19:43 PM IST
1/7

एखादी व्यक्ती जेव्हा अंतराळात जाते तेव्हा त्यांच्या मनात हा प्रश्न येतो की, ते तिथे काय पदार्थ खातील आणि ते कसे शिजवतील?

2/7

कोणताही व्यक्ती ज्यावेळी अंतराळात जाते त्यावेळी तिच्यासोबत दर दिवसाच्या हिशोबाने 1.7 किलोग्राम खाणं पाठवलं जातं.

3/7

मात्र यामध्ये 450 ग्रॅम कंटेनरचं वजन असतं, ज्यामध्ये खाणं पॅक केलं जातं. 

4/7

अंतराळात गुरुत्वाकर्षण नसतं, त्यामुळे अन्न खराब होऊ नये म्हणून विशिष्ट पद्धतीने शिजवलं जातं. 

5/7

पाठवल्यावर ते लगेच गरम करून ॲल्युमिनियम किंवा बाईमेटलिकमध्ये पॅक केलं जाते. यामुळे अन्न तिथपर्यंत गरम राहतं. त्यात रेडिएशन थांबवण्याची यंत्रणाही आहे.

6/7

अंतराळातील अंतराळवीरांच्या भूकेबद्दल बोलायचं झालं तर तर काही वेळा त्यांना तिथे भूकही लागत नाही, पण ते त्यांच्या शरीराच्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक अन्न खातात.   

7/7

याशिवाय ते अंतराळात अन्न शिजवत नाहीत, तर पृथ्वीवरून अन्न पाठवण्यात येतं.