ड्राय क्लीनिंग आणि न धुता महागडे कपडे कसे ठेवावे?

महागडे कपडे वापरल्यानंतर ते ड्राय क्लीनिंगला टाकावे लागतात. पण प्रत्येक वेळी ते लगेचच टाकणं शक्य नसतं. अशावेळी ड्राय क्लीनिंग आणि न धुता महागडे कपडे कसे चांगले ठेवावे याबद्दल या खाय टीप्स

Apr 28, 2024, 11:24 AM IST

महागडे कपडे वापरल्यानंतर ते ड्राय क्लीनिंगला टाकावे लागतात. पण प्रत्येक वेळी ते लगेचच टाकणं शक्य नसतं. अशावेळी ड्राय क्लीनिंग आणि न धुता महागडे कपडे कसे चांगले ठेवावे याबद्दल या खाय टीप्स

1/8

एखाद्या खास कार्यक्रमासाठी महागडे कपडे पण काही वेळासाठी घालतो. दोन तीन तास घातलेले कपड्यांना प्रत्येक वेळी ड्राय क्लीनिंग गरज नसते. मग हे कपडे कसे ठेवावे जेणेकरुन त्यांना घाण वास आणि ते खराब होऊ नयेसाठी काय करावे. 

2/8

महागडे कपडे हे अतिशय नीट आणि चांगल्या जागी ठेवणे गरजे आहे. नाहीतर तुमची एक चूक महागडे कपडे लवकर खराब होण्यास कारणीभूत ठरतात. 

3/8

तुम्ही महागडे कपडे काढल्यानंतर सर्वप्रथम हवेशीर हॅन्गरवर लावून ठेवा. ज्यामुळे त्यातील दुर्गंधी निघून जाईल. 

4/8

त्यानंतर हे कपडे एका झिप असलेल्या पिशवीत ठेवावे. ज्यामुळे त्यांना धूळ आणि किडे लागणार नाहीत. 

5/8

आता हे कपडे स्वच्छ आणि कोरड्या वॉर्डरोबमध्ये नीट ठेवावे. 

6/8

कपड्यांना एकावर कधी ठेवू नयेत. वेगवेगळ्या कपड्यांचा फोल्डमध्ये ते ठेवावेत. 

7/8

अधून मधून या कपड्यांना काढून त्यांची घडी बदलावी आणि त्यांना हवेत ठेवावे. 

8/8

कपड्यांसोबत सिलिसिया जेलची पाकिटे ठेवावे. यामुळे कपड्यांमधील ओलावा शोषण घेतला जातो.