हिवाळ्यात घरीच करा विकतसारखं घट्ट दही, 'या' सिक्रेट टिप्स लक्षात ठेवा

रोजच्या जेवणात दह्याचे सेवन करणे चांगले असते. दह्यापासून कढी, कोशिंबीर, ताक असे अनेक पदार्थ करता येतात. मात्र थंडीच्या दिवसात दही व्यवस्थित लागत नाही. अशावेळी या टिप्स लक्षात ठेवा.

| Dec 04, 2024, 14:08 PM IST

Best Tips For Homemade Dahi: रोजच्या जेवणात दह्याचे सेवन करणे चांगले असते. दह्यापासून कढी, कोशिंबीर, ताक असे अनेक पदार्थ करता येतात. मात्र थंडीच्या दिवसात दही व्यवस्थित लागत नाही. अशावेळी या टिप्स लक्षात ठेवा.

1/7

हिवाळ्यात घरीच करा विकतसारखं घट्ट दही, 'या' सिक्रेट टिप्स लक्षात ठेवा

How to Make Thick Curd In Winter Useful Tips in marathi

दह्यात पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात आढळतात. ज्याच्या सेवनाने आरोग्यासाठी अनेक होतात. यात प्रथिने, कॅल्शियम आणि जीवनसत्वांचा चांगला स्त्रोत आहे. 

2/7

अनेकज जण घरीच दह्याचे विरजण लावतात. मात्र, थंडीच्या दिवसात गारवा जास्त असल्याने दही लागण्यासाठी खूप वेळ जातो.  तसंच, दही परफेक्ट लागत नाही. अशावेळी या टिप्सचा अवलंब करु शकता. 

3/7

दूध व्यवस्थित उकळवून घ्या. दुध उकळल्यानंतर थोडं थंड होण्यासाठी ठेवा. दूध कोमट झाल्यानंतर त्यात दह्याचे विरजण घालून चमच्याने ढवळून घ्या आणि सेट होण्यासाठी काहीकाळ ठेवा. ही दही लावण्याची नेहमीची पद्धत आहे. 

4/7

 दही लावल्यानंतर त्या भांड्याला अॅल्युमिनियम फॉइल लावून घ्या. नंतर त्यावर कपडा बांधून ठेवा 

5/7

दही लावताना विरजण जास्त घ्या. दही लावलेले भांडे चपातीच्या डब्यात ठेवून झाकण लावून घ्या. हा डबा एका कापडात गुंळाडून ठेवा. काही तासांतच मलाईदार दही तयार होईल

6/7

दह्याचे विरजण लावल्यावर सेट होण्यासाठी तुम्ही कुकरचा वापर करु शकता. कुकरमध्ये गरम पाणी घालून त्यावर स्टँड ठेवा. नंतर त्यात दह्याचे भांडे ठेवून झाकण बंद करा. आता 4 तासांसाठी दही सेट होण्यासाठी ठेवा

7/7

 दह्यात विरजण लावल्यानंतर त्यात एक हिरवी मिरची ठेवा. नंतर एका उबदार ठिकाणी दह्याचे भांडे ठेवा. किंवा दह्याचे भांडे लोकरीच्या कपड्यात गुंडाळून ठेवा. नंतर काही तासांनी दही सेट झालेले असेल.