पावसाळ्यात कशी घ्याल डोळ्यांची काळजी

पावसाळ्यात डोळ्यांची देखील विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे. 

Jul 08, 2019, 18:25 PM IST

मुंबई : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत असतो. पवसाळ्यात पसरणारी अस्वच्छता त्यापासून निर्माण होणारी दुर्गंधी. परिणामी पसरणारे आजार मोठ्या प्रमाणात डोकं वर काढतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यात डोळ्यांची देखील विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे. पावसापासून डोळ्यांचे संरक्षण करण्याच्या काही टिप्स 

1/5

पावसाळ्यात कशी घ्याल डोळ्यांची काळजी

पावसाळ्यात कशी घ्याल डोळ्यांची काळजी

बाहेरून आल्यानंतर हात स्वच्छ पाण्यात धुवा. सतत डोळ्यांना हात लावणं, डोळे चोळणं टाळा. त्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता कमी असते.    

2/5

पावसाळ्यात कशी घ्याल डोळ्यांची काळजी

पावसाळ्यात कशी घ्याल डोळ्यांची काळजी

तुम्हाला फ्लू किंवा आय इंफेक्शनचा त्रास होत असेल, तर तो त्रास कमी करण्यासाठी मुबलक पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.

3/5

पावसाळ्यात कशी घ्याल डोळ्यांची काळजी

पावसाळ्यात कशी घ्याल डोळ्यांची काळजी

पावसाळ्यात लेन्सचा वापर शक्यतो टाळा. त्यामुळे डोळे प्रचंड लाल होवू शकतात. लेंसमुळे डोळे आकर्षक दिसतात परंतू त्याचा धोका देखील असतो. 

4/5

पावसाळ्यात कशी घ्याल डोळ्यांची काळजी

पावसाळ्यात कशी घ्याल डोळ्यांची काळजी

पावसाळ्यात आहारात आरोग्यास लाभदायक फळे खावीत. त्याचबरोबर आहारात लसूण, आलं, मिरी, हिंग, जिरे, हळद, कोथिंबीर या पदार्थांचा समावेश अत्यंत लाभदायक ठरतो. पाणी उकळूनच प्यावे. त्याचप्रमाणे नॉनव्हेज शक्यतो टाळायला हवे. 

5/5

पावसाळ्यात कशी घ्याल डोळ्यांची काळजी

पावसाळ्यात कशी घ्याल डोळ्यांची काळजी

डोळ्यांच्या कॉर्नियाजवळ रक्त साचल्याने तो भाग काळसर वाटतो. असे असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.