व्हॅक्सिंग केल्यानंतर भाजलंय?; Wax Burn लवकर बरे करण्यासाठी 'या' टिप्स लक्षात ठेवा

शरीरावर नको असलेले केस काढण्यासाठी व्हॅक्सिंग हा सगळ्यात बेस्ट उपाय असल्याचे म्हटले जाते. मात्र, व्हॅक्सिंग करताना वेदनाही होतात. पण एकदा व्हॅक्सिंग केल्यानंतर दीर्घकाळापर्यंत केसांची वाढ होत नाही. त्यामुळंच अनेक जण रेझरचा वापर करत नाहीत. 

| May 20, 2024, 18:47 PM IST

शरीरावर नको असलेले केस काढण्यासाठी व्हॅक्सिंग हा सगळ्यात बेस्ट उपाय असल्याचे म्हटले जाते. मात्र, व्हॅक्सिंग करताना वेदनाही होतात. पण एकदा व्हॅक्सिंग केल्यानंतर दीर्घकाळापर्यंत केसांची वाढ होत नाही. त्यामुळंच अनेक जण रेझरचा वापर करत नाहीत. 

1/8

व्हॅक्सिंग केल्यानंतर भाजलंय?; Wax Burn लवकर बरे करण्यासाठी 'या' टिप्स लक्षात ठेवा

How to treat waxing burn at home Tips in marathi

व्हॅक्सिंगचे अनेक फायदे आहेत. तसंच, शरीरवरील मृत त्वचा काढून टाकणे आणि टॅनिंग कमी करणे. मात्र व्हॅक्सिंगचे काही नुकसानपण आहेत. खासकरुन उन्हाळ्याच्या दिवसांत व्हॅक्समुळं त्वचा जळू शकते. अशावेळी व्हॅक्सिंग केल्यानंतर किंवा घरी स्वतःच व्हॅक्स करत असताना त्वचा भाजण्याची शक्यता असते. त्यामुळं हे घरगुती उपाय लक्षात असू द्यात.   

2/8

थंड पाण्याचा वापर

How to treat waxing burn at home Tips in marathi

हा सगळ्यात प्रभावी उपाय आहे. भाजलेल्या ठिकाण लगेचच थंड पाण्याखाली धरा आणि कमीत कमी 10 मिनिटापर्यंत पाण्याखाली ठेवा. थंड पाणी जळजळ कमी करते आणि सूज येण्यापासून थांबवते.   

3/8

कोरफडीचे जेल

How to treat waxing burn at home Tips in marathi

  कोरफडचे जेल भाजलेल्या जखमांसाठी रामबाम उपाय आहे. यामुळं सूज कमी करण्याबरोबरच वेदना कमी करण्याचेही गुण असतात. अशावेळी व्हॅक्समुळं भाजलेल्या जागां थंड पाण्याने धुतल्यानंतर त्यावर कोरफडीचे जेल लावा. दिवसातून दोन ते तीन वेळा कोरफडीचे जेल लावा. 

4/8

मध

How to treat waxing burn at home Tips in marathi

मध हे एक नैसर्गिंकरित्या अँटीसेप्टिक आणि मॉइस्चरायजर आहे. जखमा लवकर भरुन काढण्यास मध मदत करते तसंच, संक्रमणापासूनही वाचवते. भाजलेल्या ठिकाणी थंड पाण्याने धुतल्यानंतर त्यावर थोडेसे मध लावा त्यानंतर एका साफ पट्टीने बांधून ठेवा आणि काही तासांनंतर बदला.   

5/8

बटाटा

How to treat waxing burn at home Tips in marathi

बटाट्यातही थंडपणा आणि सूज कमी करणारे गुण असतात. एक कच्च बटाटा किसून घ्या आणि त्याची पेस्ट जळालेल्या ठिकाणी लावा. त्यानंतर 15 ते  20 मिनिटांनी थंड पाण्याने धुवून टाका. 

6/8

नारळाचे तेल

How to treat waxing burn at home Tips in marathi

नारळाच्या तेलात एक नैसर्गिकरित्या मॉइस्चरायजर असते जे जखम भरण्यासाठीही फायदेशीर आहे. जळालेल्या ठिकाणी नारळाचे तेल लावा. लक्षात ठेवा की गंभीर जखमांवर नारळाचे तेल लावू नका.   

7/8

या गोष्टींची काळजी घ्या

How to treat waxing burn at home Tips in marathi

भाजलेल्या ठिकाणी तर फोड आले असतील तर ते फोडू नका. भाजलेल्या ठिकाणी कोणतेही लेप किंवा मलम लावण्यापूर्वी ते स्वच्छ धुवून घ्या. जर जखम जास्त असेल आणि खूप दिवसांनंतरही बरी होत नसेल तर डॉक्टरांसोबत संपर्क करा. 

8/8

Disclaimer

How to treat waxing burn at home Tips in marathi

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)