जास्त मद्यपानामुळे अचानक होऊ शकतो मृत्यू; ICMR ने समोर आणली महत्त्वाची माहिती

लग्नात नाचता, गरबा खेळताना आणि जीम करताना हृदयविकाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहेत. हृदयविकाराच्या घटनांचे आकडे ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. मात्र आता वैद्यकीय संशोधन परिषदेने या घटना वाढण्या मागचं कारण शोधून काढलं आहे.  

Nov 27, 2023, 16:14 PM IST
1/8

heart attack

आतापर्यंत कोरोनाची लस घेतलेल्या लोकांना हृदयविकाराच्या घटनांचा जास्त त्रास होत असल्याचे म्हटलं जात होतं. मात्र आता याबाबत महत्त्वाचा खुलासा झाला आहे.

2/8

icmr study on corona

आयसीएमआरने गेल्या आठवड्यात जारी केलेल्या अहवालात अशा सर्व गोष्टींबद्दल खुलासा केला आहे. आयसीएमआरने कोरोनामुळे या घटना होत असल्याच्या चर्चांवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

3/8

ICMR Study

अभ्यासात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, कोरोनाची लस अचानकपण आलेल्या मृत्यूचे कारण नाही. आयसीएमआरच्या अहवालात असे मृत्यू कसे टाळता येतील याबद्दल काही सूचना देखील दिल्या आहेत.

4/8

corona virus vaccine

'आमच्या कोरोना लसीकरणामुळे अचानक झालेल्या मृत्यूशी कोणताही संबंध आढळला नाही. त्याऐवजी, कोरोना लसीमुळे अचानक मृत्यूचा धोका आणखी कमी झाला आहे,' असे अहवालात म्हटलं आहे.  

5/8

drinking alcohol

कुटुंबातील आकस्मिक मृत्यूचा इतिहास, कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होणे किंवा मोठ्या प्रमाणावर दारू पिणे आणि प्रतिबंधित औषधांचे सेवन करणे ही अशा मृत्यूंसाठी कारणीभूत ठरत आहेत.

6/8

corona health update

कुटुंबातील आकस्मिक मृत्यूच्या इतिहास किंवा कोरोनाच्या उपचारासाठी दाखल होण्यावर कोणीही नियंत्रण ठेवू शकत नाही, असेही आयसीएमआरने म्हटलं आहे.

7/8

alcohol drinking limit

पण जास्त प्रमाणात दारु पिणे आणि प्रतिबंधित किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेल्या औषधांचा जास्त डोस घेणे टाळणे हे निश्चितपणे तुमच्या अधिकारात आहे.

8/8

alcohol unnatural death

इतर गोष्टींच्या तुलनेत, मद्यपानाची वारंवारता जितकी जास्त असेल तितकी अचानक, अस्पष्ट मृत्यूची शक्यता जास्त असते.