अन्नाला पाय लावणं महापाप, मग नववधू गृहप्रवेश करताना का ओलांडते तांदळानं भरलेलं माप?

Wedding Rituals : तुळशीविवाहनंतर सर्वत्र लग्नाचे मुहूर्त असतात. त्यामुळे सर्वत्र लग्नाचे चौघड्या वाजत आहे. वधू वरांसोबत दोन्ही कुटुंबात लग्नाचा उत्साह मोठ्या थाट्यामाट केला जातो. लग्नातील प्रत्येक विधीमागे काही ना काही कारणं असतात. त्यातील एक विधी असा आहे जी वधूच्या गृहप्रवेशाशी जोडला गेलाय. 

| Dec 08, 2024, 22:59 PM IST
1/10

लग्नाच्या विधीमागे कारण 99 टक्के लोकांना माहिती नसतात. फक्त पिढी न पिढी प्रथा सुरु असते आणि ती पुढे नेली जाते. 

2/10

हिंदू धर्मात अन्नाला पाय लावल्यास खूप मोठा महापाप समजला जातो. मग हिंदू धर्मात नववधूच्या गृहप्रवेशावेळी घरात प्रवेश करताना तांदळानं भरलेला माप का ओलांडतात?

3/10

हिंदू धर्मात नववधूचं स्वागत सासरी आणि नवीन घरात मोठ्या थाट्या माट्यात केलं जातं. हे स्वागत करताना काही विधीही देखील केले जातात. 

4/10

हिंदू धर्मात वधूने गृहप्रवेश करताना नवीन घरात प्रवेश करताना तांदळानं भरलेलं माप उजव्या पायानं ओलांडायचं असतं. 

5/10

जर अन्नाला पायानं स्पर्श करणं अतिशय अशुभ मानलं जातं. मग सौभाग्यवती सासरच्या घरात प्रवेश करताना तांदळाला पायाने स्पर्श करणे शुभ कसं असू शकतं. 

6/10

धार्मिक मान्यतेनुसार, लग्नानंतर घरात येणाऱ्या नव्या नवरीला साक्षात देवी लक्ष्मीचं रुप मानलं जातं. असं म्हणतात की, तिच्या स्वागतासाठी दारात ठेवलेल्या कलशातील तांदूळ तिच्या पावलांनी घरात विखुरले की, तिचं सासर सदैव सुख, समृद्धीनं संपन्न राहतं. त्यामुळेच लग्नानंतर हा महत्त्वाचा विधी पार पाडला जातो.

7/10

तांदूळ हे असे एक तृणधान्य आहे की ज्याचा उपयोग विवाह प्रसंगी वधू-वरांना आशीर्वाद देताना अक्षता या नावाने त्यांचा उपयोग होतो. या अक्षता कौमार्याचे, अखंडतेच्या प्रतीक आहेत. ती नवरी जेव्हा आपल्या नव्या घरी येते, आणि दारात उभी राहते, तेव्हा एक माप अशा अक्षता नी भरून दरवाज्यात ठेवले जाते.

8/10

जेव्हा घरात नववधू प्रवेश करते त्यानंतर घरातील कुमारिकांना पैसे किंवा एखादी भेटवस्तू दिली जाते. हे प्रतीक असं मानलं जातं की, घरात देवी लक्ष्मीचा प्रवेश झाला आहे. तसंच ती आपल्या सोबत धन-संपदा घेऊन आली आहे.

9/10

माप ओलांडण्याआधी वराच्या घरी स्वच्छता, झाडलोट करून लक्ष्मीपूजनाची म्हणजे वधूच्या गृहप्रवेशाची तयारी करण्यात येते. त्यामुळे माप कलंडताना पसरलेल्या अक्षता स्वच्छ धुवून त्यांचा पुर्नवापर करणे किंवा एखाद्या गरीबाला ते शिधा म्हणून देणे शुभ मानले जाते. 

10/10

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)