दुधात मिसळतात कपडे धुण्यासाठी लागणारा कॉस्टिक सोडा आणि मिल्क पावडर; अशी ओळखा भेसळ

तुमच्या घरी दरोरोज येणारं दूध खरंच शुद्ध आहे का? की त्यामध्ये विष मिसळलं जातंय. भेसळखोर दुधात कॉस्टिक सोडा मिसळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Sep 04, 2023, 22:40 PM IST

milk adulteration : दूध आरोग्यासाठी अत्यंत सकस आहार मानला जातो. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत आरोग्य चांगलं राहावं यासाठी दूध पिण्याचा सल्ला डॉक्टर मंडळी देतात. मात्र हेच दूध तुमच्यासाठी जीवघेणं ठरू शकतं. कारण दुधात कपडे धुण्यासाठी लागणारा कॉस्टिक सोडा आणि मिल्क पावडर वापरली जात आहे. अशी ओळखा दुधातील भेसळ.

1/7

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात भेसळयुक्त दूध बनवणा-या डेअरीचा पर्दाफाश करण्यात आला.नाशिक ग्रामीण पोलिसांनी डेअरीवर छापा टाकून कारवाई केली. कारवाईत दुधात मिसळण्यात येणारा कपडे धुण्याचा सोडा आणि घातक रासायनिक पावडरचा मोठा साठा हस्तगत केला.

2/7

भेसळयुक्त दूध प्यायल्यानं कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्याचा धोका असतो. तसच हाडं कमकुवत होतात. रसायनांमुळे आतडं आणि यकृताचं नुकसान होतं. 

3/7

भेसळयुक्त दुधाची चव कडवट असते. 

4/7

भेसळयुक्त दूधात लिटमस पेपरचा रंग लाल किंवा निळा होतो. 

5/7

भेसळयुक्त दुधाचे डाग फरशीवर रहातात भेसळयुक्त दुधाचा खवा कडक होतो. 

6/7

भेसळयुक्त दुधाला साबणाचा वास येतो हाताच्या बोटाने दूध घासल्यास फेस तयार होतो. 

7/7

जे दूध घेताय ते भेसळयुक्त दूध तर नाही ना हे तपासून घ्या.