Income Tax : 1 एप्रिलपासून लागू होणार 5 नवीन नियम, तुम्हाला माहीत आहेत का?
.
मुंबई : Income Tax Rules 2021: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2021 (Budget 2021) सादर करताना प्राप्तिकर नियमात बदल करण्याची घोषणा केली होती. हे बदल 1 एप्रिल 2021 पासून अंमलात येणार आहेत. नवीन नियमांनुसार, 75 वर्षांवरील किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना 1 एप्रिलपासून आयटीआर भरून पेन्शनमधून मिळकत आणि त्याच बँकेच्या निश्चित ठेवींवरील व्याज सूट देण्यात येईल. याव्यतिरिक्त, अर्थमंत्र्यांनी ईपीएफ खात्यात वर्षाकाठी अडीच लाखाहून अधिक योगदानावर टॅक्स द्यावा लागेल, अशी घोषणा केली. 1 एप्रिलपासून अंमलात येणाऱ्या अशा 5 आयकर बदलांवर एक नजर.