Cricketच्या इतिहासातील India-Australia मधील वादग्रस्त क्षण

Jan 05, 2021, 13:48 PM IST
1/4

अनिल कुंबळे भडकला

अनिल कुंबळे भडकला

2008 मधील टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची वादग्रस्त मॅच ठरली. या सिरीजमध्ये दोन्ही टीम आपापसात भिडत होत्या. वादग्रस्त अम्पायरिंग आणि मंकीगेट वादामुळे सिरीज ओळखली जाते. यावेळी टीम इंडीयाचा कॅप्टन अनिल कुंबळे खूप नाराज होता. टीम इंडीया खेळाच्या भावनच मैदानात उतरते असे त्याने स्पष्ट केले.

2/4

मंकीगेट वाद

मंकीगेट वाद

2007-08 मध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती. मेलबर्नमध्ये 337 रन्सनी हरल्यानंतर टीम इंडियाची दुसरी मॅच सिडनीच्या मैदानावर सुरु होती. पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडीया मैदानात आक्रमक दिसत होती. हरभजन सिंग बॅटींग करत होता आणि एंड्र्यू सायमंडसोबत त्याच भांडण झालं. हरभजन सायमंडला मंकी म्हणजे म्हणाल्याचा आरोप कॅप्टन रिकी पॉंटींगने पंचांकडे केला.दिवसाचा खेळ संपला आणि सुनावणी रात्रीपर्यंत चालली. हरभजना दोषी ठरवत 3 मॅचसाठी बॅन करण्यात आलं. पण हे प्रकरण इथे मिटलं नाही. टीम इंडीयाचा तत्कालिन कॅप्टन अनिल कुंबळे आणि पूर्ण टीम इंडीया हरभजन सिंहच्या पाठीशी खंबीरपण उभी होती. जोपर्यंत भज्जीवरचे आरोप मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत टीम इंडीया पुढची मॅच खेळणार नाही असं ठरलं. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर भज्जीवरील आरोप निरर्थक असल्याचे स्पष्ट झाले. हरभजनने सायमंडला 'मंकी' नव्हे तर 'तेरी माॅ की' म्हटले होते. यामुळे याला मंकीगेट वाद म्हटलं जातं.

3/4

गंभीरने वॉट्सनला मारलं कोपर

गंभीरने वॉट्सनला मारलं कोपर

2008 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडीया होती. यावेळी दिल्ली टेस्ट दरम्यान दोन टीममध्ये खटके उडाले. मॅच दरम्यान टीम ऑस्ट्रेलिया स्लेजिंग करत होती. गौतम गंभीर बॅटींग करत होता. तो आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकला नाही. त्याने शेन वॉट्सनला कोपर मारला. यानंतर अम्पायरने गंभीरवर पुढच्या मॅचसाठी बंदी घातली.    

4/4

विराटने दाखवलं मिडल फिंगर

विराटने दाखवलं मिडल फिंगर

2011-12 मध्ये टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर होती. त्यावेळी विराट कोहलीला (Virat Kohali) टीकेचा धनी व्हाव लागंल. त्याने मॅच दरम्यान प्रेक्षकांना मिडल फिंगर दाखवले. यानंतर मॅच फीमधील 50 टक्के दंड ठोठावण्यात आला. क्रिकेटरने प्रतिक्रिया द्यायला नको पण दर्शक तुम्हाला आई बहीणीवरुन शिव्या देत असतील तेव्हा काय कराल ? असे ट्वीट त्याने म्हणाले.