भारतानं हेरली चीनची चाल; रक्त गोठवणाऱ्या बर्फाळ शक्सगाम खोऱ्यात नेमकं काय सुरु होतं?

India China Shaksgam Valley Importance: भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या या तणावाच्या परिस्थितीमध्ये आता एकाएकी शक्सगाम खोऱ्याची चर्चा होताना दिसत आहे.   

May 03, 2024, 11:29 AM IST

India China Shaksgam Valley Importance: भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारा तणाव गंभीर वळणावर आला असून, शेजारी राष्ट्राकडून सातत्यानं सुरु असणाऱ्या खुरापती यामध्ये आणखी भर टाकताना दिसत आहेत. 

1/8

पाकव्याप्त काश्मीर

india china conflict Shaksgam Valley Importance photos

India China Shaksgam Valley Importance: पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणाऱ्या शक्सगाम खोरं या भागात सध्या चीनकडून पक्क्या रस्त्याचं बांधकाम सुरु करण्यात आलं आहे. 

2/8

सॅटेलाईट फोटो

india china conflict Shaksgam Valley Importance photos

सॅटेलाईटनं टीपलेल्या फोटोंमुळं ही बाब समोर आली असून, त्यात चीन इथं सिमेंटचा पक्का रस्ता बांधत असल्याचं लक्षात येत आहे. 

3/8

सियाचीनपासून नजीकचा प्रदेश

india china conflict Shaksgam Valley Importance photos

जगातील सर्वाधिक उंचीवर असणारी युद्धभूमी अशी ओळख असणाऱ्या सियाचीनपासून हा प्रदेश बराच जवळ असल्याचं सांगितलं जातं. 

4/8

शक्सगाम खोरं

india china conflict Shaksgam Valley Importance photos

दरम्यान शक्सगाम खोऱ्यामध्ये चीनकडून करण्यात येणाऱ्या या बांधकामाचा भारताकडून निषेध करण्यात येत आहे. हा आमच्याच देशाचा भाग असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून चीनला खडसावण्यात आलं आहे.   

5/8

पाकिस्तान- चीन

india china conflict Shaksgam Valley Importance photos

1963 मध्ये झालेल्या पाकिस्तान- चीनमधील कथित कराराला आपण कधीच स्वीकारलं नसून, शक्सगाम खोऱ्याला आम्ही कायमच आमच्या देशाचाच एक भाग म्हणत आलो आहोत असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. 

6/8

परराष्ट्र मंत्रालय

india china conflict Shaksgam Valley Importance photos

परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार त्या कथित कराराच्या माध्यमातून पाकिस्ताननं बेकायदेशीर प्रकारे शक्सगाम खोऱ्याचा भाग चीनला सोपवण्याचा प्रयत्न केला होता. 

7/8

शक्सगामचं संरक्षण

india china conflict Shaksgam Valley Importance photos

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार शक्सगाम खोऱ्याच्या परिसराचं संरक्षण करण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याचा हक्क आपल्याला असून, पूर्व लडाख- चीनमधील तणावामध्ये आता शक्सगामवरही शेजारी राष्ट्राची वक्रदृष्टी असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

8/8

चीनच्या आक्षेपार्ह पावलं

india china conflict Shaksgam Valley Importance photos

सध्याच्या घडीला चीनच्या आक्षेपार्ह पावलामुळं जागतिक स्तरावर शक्सगामचं खोरं चर्चेचा विषय ठरत असून, या भागाचे फोटोही सोळल मीडियावर व्हायरल होत आहेत.