गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या कामाची बातमी; ट्रेन सुटली तर तिकिटाचे पैसे परत मिळतील?

ट्रेन सुटली तर तिकिटाचे पैसे  परत कसे मिळवायचे जाणून घेऊया प्रोसेस.

| Aug 29, 2024, 15:24 PM IST

Indian Railway Ticket Refund Rules : गणपती म्हणजे कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. काही झालं तरी गणपतीला गावी जायचचं असं सगळ्यांचच ठरलेलं असतं. अनेक जण तीन चार महिने आधीच तिकीट काढून ठेवतात. वेळेवर रेल्वे स्टेशनवर पोहचूनही अनेकांना ट्रेन मिळत नाही. अशा स्थितीत   ट्रेन सुटली तर तिकिटाचे पैसे परत मिळू शकतात.

 

 

1/7

गणपतीत कोकणात जाणारे प्रवासी रेल्वेलाच पसंती देतात. गणेशोत्सवात कोकण रेल्वेला तुफान गर्दी असते. अनेक प्रवाशांची ट्रेन चुकते आणि तिकीटाचे पैसे वाया जातात. ट्रेन सुटली तर तिकिटाचे पैसे परत मिळवता येतात.  

2/7

कन्फर्म तिकिट असेल तरच प्रवासी टीडीआर दाखल करू शकतात. TDR दाखल करण्यापूर्वी अटी आणि शर्ती वाचून घ्या. 

3/7

TDR दाखल केल्यानंतर 60 दिवसांच्या आत पैसे परत मिळतात.

4/7

ऑनलाईन अथवा ऑफलाईन टीडीआर फाईल करता येतो.

5/7

रेल्वे सुटल्यानंतर एक तासाच्या आत टीडीआर फाईल करावा लागेल. 

6/7

तिकिटाची रक्कम परत मिळविण्यासाठी टीडीआर (Ticket Deposit Receipt-TDR) दाखल करावा लागतो. 

7/7

रेल्वे तिकिट रिफंड नियमानुसार, प्रवाशाची रेल्वे सुटली तर प्रवाशाला तिकिटाचे पैसे परत मिळतात.