Indian Railways : इतिहासात पहिल्यांदाच रेल्वेने घेतला हा निर्णय, कोट्यवधी प्रवाशांना धक्का

IRCTC : भारतीय रेल्वेने डिजिटल इंडियाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे.  

| May 07, 2023, 15:32 PM IST

IRCTC : भारतीय रेल्वेने डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला खरा.पण भारतीय रेल्वेने घेतलेला हा निर्णय ऐकून कोरोडो प्रवाशांना मोठा धक्का बसेल. प्रिंटिंग प्रेस बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतलाय. रेल्वे बोर्डाने हा मोठा ऐतिहासिक निर्णय का घेतला आहे? 2017 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या कार्यकाळात असा निर्णय घेण्यात आला होता, ज्यामध्ये रेल्वेद्वारे चालवले जाणारे प्रिंटिंग प्रेस बंद करण्याची चर्चा होती.

1/5

छपाईचे संपूर्ण कंत्राट आता खासगी विक्रेत्यांना

छपाईचे संपूर्ण कंत्राट आता खासगी विक्रेत्यांना

 रेल्वेची प्रिटिंग प्रेस बंद झाल्यानंतर छपाईचे कंत्राट देण्यात येणार आहे. हे खासगी असणार आहे. ही छापखाने बंद झाल्यानंतर छपाईचे संपूर्ण कंत्राट खासगी विक्रेत्यांना दिले जाणार आहे. 

2/5

रेल्वेच्या प्रिटिंग प्रेस होणार बंद

रेल्वेच्या प्रिटिंग प्रेस होणार बंद

मिळालेल्या वृत्तानुसार, रेल्वे मंत्रालयाने 14 पैकी 9 प्रिंटिंग प्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित 5 मुद्रणालये रेल्वेच्या ताब्यात ठेवण्यात आली होती. आता या प्रिटिंग प्रेस रेल्वेकडून बंद करण्यात येणार आहे, तसा रेल्वेकडून निर्णय घेण्यात आला आहे.

3/5

मुंबईसह दिल्लीतील प्रेस बंद

मुंबईसह दिल्लीतील प्रेस बंद

जून 2019 च्या  रेल्वेच्या आदेशात असे म्हटले आहे की, भायखळा मुंबई, हावडा, शकूरबस्ती-दिल्ली, रोयापुरम चेन्नई आणि सिकंदराबाद येथे चालणाऱ्या प्रिटिंग प्रेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 4 जून 2019 रोजीच्या रेल्वेच्या पत्रात प्रेस बंद करण्याचे म्हटले होते. या बातम्यांनंतर प्रश्न उपस्थित होत आहे की, आगामी काळात रेल्वेची तिकिटे कशी छापली जाणार? त्यासाठी आगामी काळात खासगी प्रिटिंग प्रेसना निविदा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

4/5

रेल्वेची तिकिटे कशी छापली जाणार?

रेल्वेची तिकिटे कशी छापली जाणार?

तिकिटांची छपाई आणि इतर साहित्य तयार करण्याचे कंत्राट खासगी मुद्रणालयाला जाणार आहे. रेल्वे आता फक्त गाड्या चालवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. रेल्वेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आरक्षित तिकिटे बहुतेक ई-तिकीटिंगद्वारे बुक केली जातात. याशिवाय 81 टक्के तिकिटे ई-तिकीटिंगद्वारे डिजिटल पद्धतीने बुक केली जातात.

5/5

रेल्वेचे खासगीकरण होणार?, मंत्री म्हणाले...

रेल्वेचे खासगीकरण होणार?, मंत्री म्हणाले...

आता रेल्वेच्या खाजगीकरणाबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे. केंद्र सरकार रेल्वेचे खाजगीकरण करणार असल्याची बातमी काही दिवसांपासून चर्चेत होती. यासोबतच सरकार इतर अनेक कंपन्या खासगी लोकांच्या हातात देऊ शकते. रेल्वेच्या खासगीकरणाबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. संसदेत माहिती देताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, अशी कोणतीही योजना नाही. रेल्वेमंत्र्यांनी खासगीकरणाबाबत साफ नकार दिला.