Women IPL Auction : सांगलीच्या लेकिनं गाजवलं क्रिकेटचं मैदान; स्मृती मंधानाच्या यशाचे भागीदार कोण माहितीये?

क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील ही लोकप्रिय खेळाडू एका नव्या रुपात तुमच्यासमोर... पाहा Photos 

Feb 13, 2023, 15:19 PM IST

Women IPL Auction : भारतीय पुरुष क्रिकेट संघ उल्लेखनीय कामगिरी करत असतानाच भारतीय महिला क्रिकेट संघातील मुलींनीही खऱ्या अर्थानं मैदान गाजवण्यास सुरुवात केली आहे. या संघातील एक नाव म्हणजे तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. हे नाव म्हणजे, क्रिकेटपटू स्मृती मंधानाचं. तिनं आणखी एक मजल मारलीये ती म्हणजे आयपीएलमध्ये कोट्यवधी रुपये कमवण्याची.  ऐतिहासिक महिला प्रीमियर लीग (WPL) साठीचा पहिला लिलाव मुंबईच्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरु झाला. जिथं भारताची स्फोटक सलामीवीर स्मृती मंधाना 3.40 कोटी इतक्या घसघशीत रकमेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघाने विकत घेतलं. 

1/6

smriti mandhana

indian womens cricket team star smriti mandhana family and personal life latest Marathi news

क्रिकेट क्षेत्रात पुढे जात असताना स्मृती नकळत अनेक नवोदित खेळाडू तरुणींसाठी आदर्श ठरली. तुम्हाला माहितीये का, तिनं भावाच्या किटनं क्रिकेट खेळण्याची सुरुवात केली होती.   

2/6

smriti mandhana age

indian womens cricket team star smriti mandhana family and personal life latest Marathi news

साधारण 11 वर्षांआधी तिनं महाराष्ट्राच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघात स्थान मिळवलं. 

3/6

smriti mandhana family

indian womens cricket team star smriti mandhana family and personal life latest Marathi news

सध्या स्मृतीच्या हाती भारतीय महिला क्रिकेच संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. 

4/6

smriti mandhana father

indian womens cricket team star smriti mandhana family and personal life latest Marathi news

या खेळात स्मृतीनं तिच्या वडिलांचा आदर्श कायम डोळ्यापुढं ठेवला. स्मृतीचा भाऊ आणि वडील सांगलीच्या संघातून खेळत होते.   

5/6

smriti mandhana family photo

indian womens cricket team star smriti mandhana family and personal life latest Marathi news

ती वडिलांच्या खेळीनं इतकी प्रभावित झाली की त्यांच्यासारखंच डाव्या हातानं खेळू लागली. 

6/6

smriti mandhana photo

indian womens cricket team star smriti mandhana family and personal life latest Marathi news

आतापर्यंत तिनं टी20 (T20 matches) कारकिर्दीमध्ये 12 सामन्यांत 2600 धावा पूर्ण केल्या आहेत. येत्या काळातही स्मृती अशीच कामगिरी करत क्रीडारसिकांच्या मनाचा ठाव घेत राहील यात शंका नाही.