महिला दिवस : भारतीय इतिहासातील कर्तृत्ववान महिला

भारतातील काही प्रेरणा देणाऱ्या महिला  

Mar 08, 2020, 12:04 PM IST
1/10

झुम्पा लाहिरी

झुम्पा लाहिरी

लेखिका झुम्पा लाहिरी या मूळच्या पश्चिम बंगाल राज्यातील आहेत. त्यांचा जन्म ११ जुलै १९६७ मध्ये झाला. `अनअकस्टम्ड` हे त्यांचं गाजलं पुस्तक. त्यांची कांदबरी `नेम सेक` खूप गाजली. या कादंबरीवर चित्रपटही साकारण्यात आला होता. अमेरिकी पुलित्झर पुरस्कार विजेत्या झुम्पा लाहिरी यांना अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतलं होतं.

2/10

सुनीता विल्यम्स

सुनीता विल्यम्स

मूळ भारतीय वंशाची अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स. सुनीता विल्यम्स हिने अंतराळ विक्रम केला. १२७ दिवस ती अंतराळात राहिली. तिने आपल्या मोहिमेत आतापर्यंत ३२२ दिवसांचा मुक्काम केला. ५० तास पेसवॉक केलाय. विश्व गुजराती सोसायटी तर्फे दिला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल विश्व प्रतिभा पुरस्कार सुनीताला देण्यात आला.

3/10

बचेंद्री पाल

बचेंद्री पाल

बचेंद्री पाल यांचा जन्म उत्तरकाशी जिल्ह्यातील गढवाली या गावात २४ मे १९५४ रोजी झाला. सामान्य कुटुंबात जन्म झाला असला तरी त्यांनी स्वप्न मात्र मोठी पाहिली. भारतीय गिर्यारोहक म्हणून त्यांनी नाव कमावले. एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहे. 

4/10

किरण बेदी

किरण बेदी

किरण बेदी या अमृतसरमधील एका मध्यम कुंटुबात मोठ्या झाल्या आहेत. भरताच्या पहिल्या महिला IPS होण्याचा महुमान त्यांनी मिळवला आहे. अनेक महिला त्यांचा आदर्श घेऊन पाऊलावर पाऊल ठेवत आहेत. किरण बेदी पोलीस अनुसंधान आणि विकास ब्युरोचे मोठे पद भुषविले आहे. त्यांनी २००७ साली सेवानिवृत्त घेतली. किरण बेदी १९९४ यांना मगसेचा पुरस्कारही मिळाला आहे. जेल सुधारणा, बाल सुधारगृह इंडिया व्हिजन फाउंडेशनची स्थापना केली.

5/10

मेरी कोम

मेरी कोम

दोन मुलांची आई मेरी कोम ही वयाच्या १८ वर्षी महिला मुष्टियुद्ध स्पर्धक ठरली. अधिक ताकदवान होण्यासाठी तिने मुलांबरोबर सराव केला. मेरी कोमने अंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला. भारताची विश्वयविजेती मुष्टियुद्ध खेळाडू म्हणून मेरी कोमने ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली. 

6/10

पी टी उषा

पी टी उषा

पी टी उषा या एक यशस्वी भारतीय ऍथलेटिक्स महिला आहे. पी टी उषाने १९८६ साली झालेल्या १०वी आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी चार सुवर्ण आणि कांस्य पदक प्राप्त केले. 

7/10

कल्पना चावला

कल्पना चावला

कल्पना चावलाचा जन्म १ जुलै १९६१ रोजी हरियाणातील करनाल गावात झाला होता. कल्पना चावला या भारतीय वंशाची अमेरीकन अंतराळवीर होत्याच शिवाय त्या पहिल्या भारतीय महिला अंतराळवीर देखील होत्या. त्यांच्या यानाने पृथ्वीकडे येताना पेट घेतला आणि त्यात त्यांचा अंत झाला.

8/10

मदर तेरेसा

मदर तेरेसा

मदर तेरेसा यांचा २६ ऑगस्ट, १९१० रोजी अल्बानियात जन्म झाला. कोलकात्याच्या आणि लंडनच्या रस्त्यावर उभे राहून त्यांनी आपल्या अनाथालयासाठी भाजीपाला आणि अन्नधान्य यांची अक्षरश: भीक मागितली होती. त्यांनी वयाच्या १८व्या वर्षी आयरिश समूहात जाण्यासाठी घर सोडलं. मदर तेरेसा यांनी संस्थेची स्थापना केली. ही संस्था १२३ देशात काम करीत होती. त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देण्यात आलाय. तर गरीब, अनाथ लोकांसाठी काम केले. त्यांना १९७९मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानी करण्यात आले.

9/10

राणी लक्ष्मीबाई

राणी लक्ष्मीबाई

राणी लक्ष्मीबाई यांना झाशीची राणी म्हणून ओळखले जाते. झाशीची राणी म्हणून ओळखली जाणारी राणी लक्ष्मीबाई या भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटीशांच्या विरोधात लढल्या. १८५७मध्ये त्यांनी ब्रिटीशांविरूद्ध लढा पुकारला. 

10/10

शास्त्रीय गायन क्षेत्रातील प्रसिद्ध नाव म्हणजे लता मंगेशकर. गायन आणि अभिनयासाठीच त्यांचा जन्म झाला. ५ वर्षांपासून लतादीदी गायन करीत आहेत. वयाच्या अवघ्या ५व्या वर्षापासून त्यांनी संगीत नाटकात काम करण्यास सुरूवात केली. भारतीय चित्रपट संगीत आणि एकूणच संगीत विश्वाला लाभलेली एक सुरेल दैवी देणगी म्हणजे लता मंगेशकर. त्यांना भारतातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आलं.