Instagram च्या 'या' धोकादायक ट्रेंडमुळे होतील तुमचा पर्सनल डाटा लीक, चूक करूच नका!

Instagram get to know me questions : सोशल मीडियावर काही कृती करताना सावध असणं गरजेचं आहे. त्याचं उदाहरण पाहा..

| Dec 29, 2023, 22:41 PM IST

Instagram trends : मोठ्या संख्येने लोक सोशल मीडियाचा वापर करतात. यावर अनेक प्रकारचे ट्रेंड देखील चालवले जातात, परंतु हे ट्रेंड तुम्हाला अडचणीत टाकू शकतात.

1/8

धोकादायक ट्रेंड

अलीकडे इन्स्टाग्रामवर Get To Know Me ट्रेंड सुरू आहे. कदाचित तुम्ही हे कधी लक्षात घेतलं नसेल, पण ट्रेंड धोकादायक ठरू शकतो. 

2/8

प्रश्न-उत्तराचा खेळ पण...

इन्स्टाग्रामवरचा ट्रेंड बघितला तर प्रश्न-उत्तराचा सोपा फॉरमॅट वाटेल, पण त्याचा तुम्हाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

3/8

सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ म्हणतात...

सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांनीही लोकांना याबाबत सावध केले आहे. वास्तविक, या ट्रेंडमध्ये तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, ज्याचा अंदाज इतरांना लावयचा असतो.

4/8

गेट टू नो मी

या उत्तरांच्या आधारे पुढची व्यक्ती तुम्हाला किती ओळखते हे ठरवले जाते. गेट टू नो मी ट्रेंडमध्ये सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारले जातात.

5/8

काय काय आवडतं

यामध्ये तुमचे वय, उंची, वाढदिवस, टॅटू, आवडता हंगाम, कलाकार, खाणे आणि काय काय आवडतं यांचा समावेश होतो.

6/8

डाटा लीक

या माध्यमातून तुमचं खातं रिसेट करताना वापरले जाणारे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यामुळे तुमचा डाटा लीक होण्याची शक्यता असते.

7/8

सावध व्हा!!

तुम्हीही असा कोणताही इन्स्टाग्राम ट्रेंड फॉलो करत असाल तर तुम्ही सावध व्हा. तुम्ही दिलेले प्रश्न तुम्हाला अडचणीत टाकू शकतात.

8/8

बॅक अकाऊंट

अशा प्रश्नांच्या आधारे तुमचं सोशल मीडिया अकाऊंटच काय तर तुमचं बॅक अकाऊंट देखील खाली होण्याची शक्यता असते. त्यामुळे सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांनी सावध राहण्याचा सल्ला दिलाय.