3 कोटी+ तिकीटांची विक्री, सलग 2 वर्ष थेअटरमध्ये झळकला 'हा' चित्रपट; विक्रम मोडत कमवले...

More Than 3 Crore Tickets Of This Movie Sold: हल्ली 100 कोटी क्लब, 200 कोटी क्लबबरोबरच थेट 500 कोटी क्लबचे चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चर्चा असते. चित्रपट आशयघन असण्यापेक्षा तो तिकीटबारीवर किती कमाई करतो हे महत्त्वाचं मानलं जातं. मात्र आपल्यापैकी फार कमी लोकांना ठाऊक असेल तरी अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट एवढा प्रचंड गाजलेला की त्याची 3 कोटी 10 लाख तिकीटं विकली गेली होती. या चित्रपटाने त्या काळात कमाईचे अनेक विक्रम मोडलेले. याच चित्रपटाबद्दल जाणून घेऊयात...

| Mar 11, 2024, 14:46 PM IST
1/9

big b amitabh bachchan movie more than 3 crore tickets sold

अमिताभ बच्चन हे भारतीय चित्रपटसृष्टीमधील महानायक म्हणून ओळखले जातात. अमिताभ किंवा अगदी बिग बी म्हटलं तरी या नावाची वेगळी ओळख सांगण्याची गरज भासत नाही. दर रविवारी त्यांच्या घराबाहेर होणारी गर्दीच आजही ते किती लोकप्रिय आहेत हे अधोरेखित करते.

2/9

big b amitabh bachchan movie more than 3 crore tickets sold

आजही हजारो लोक अमिताभ यांच्या घरासमोर गर्दी करत तासन् तास उभे राहून त्यांची एक झलक पाहण्यासाठी धडपड करताना दिसतात. अमिताभ बच्चन सुद्धा दर आठवड्याला रविवारी आपल्या चाहत्यांचे आभार मानन्यासाठी जलसा बंगल्याच्या गेटवर येऊन अभिवादन करतात.  

3/9

big b amitabh bachchan movie more than 3 crore tickets sold

अमिताभ यांनी नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये आपण आज जे काही आहोत ते चाहत्यांमुळे असल्याचं अमिताभ यांनी म्हटलं आहे. अमिताभ यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आणखीन एक गोष्ट लक्ष वेधून घेते ती म्हणजे त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाचं टायमिंग. याच चित्रपटासंदर्भात जाणून घेऊयात...  

4/9

big b amitabh bachchan movie more than 3 crore tickets sold

1975 साली अमिताभ यांचा 'दीवार' चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट अमिताभ यांच्या कारकिर्दीमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याचं तिकीट केवळ 15 रुपये इतकं होतं. शशि कपूर, अमिताभ बच्चन, नीतू सिंह, निरूपा रॉय, परवीन बाबी, इफ्तिखार, मदन पुरी, सत्येन कप्पू आणि मनमोहन कृष्णा यांनी या चित्रपटात अभिनय केला होता.  

5/9

big b amitabh bachchan movie more than 3 crore tickets sold

अमिताभ यांच्या या चित्रपटाला 2025 मध्ये तब्बल 50 वर्ष पूर्ण होतील. मात्र चित्रपटासंदर्भातील आठवणींमध्ये अमिताभ आताच म्हणजेच सन 2024 मध्येच रमले आहेत. अमिताभ यांच्या या चित्रपटावर चाहत्यांनी अगदी जीव ओवाळून टाकला होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यावेळेस 'दीवार' चित्रपट एवढा सुपरहीट ठरला की पुढील 2 वर्ष तो चित्रपटगृहांमध्ये दाखवला जात होता.  

6/9

big b amitabh bachchan movie more than 3 crore tickets sold

भारतीय बाजारपेठेत या चित्रपटाने 7.5 कोटी रुपये कमवले. केवळ मुंबईमध्ये चित्रपटाने 1 कोटींचं कलेक्शन केलं. 'दीवार' चित्रपटाची तिकीटं 1975 साली प्रती तिकीट 2.40 रुपयांना विकली गेली. म्हणजेच या चित्रपटाची 3.1 कोटी तिकीटं विकली गेली होती.  

7/9

big b amitabh bachchan movie more than 3 crore tickets sold

प्रदर्शनानंतर 'दीवार' चित्रपट एक उत्तम कमर्शिअल चित्रपट ठरला होता. हा चित्रपट 1975 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत चौथ्या स्थानी होता. चित्रपटाची कथा, संवाद आणि मांडणी सर्वांनाच फार आवडली. 'दीवार' चित्रपटानेच अमिताभ यांना 'अँगरी यंग मॅन' ही ओळख मिळवून दिली.  

8/9

big b amitabh bachchan movie more than 3 crore tickets sold

'दीवार' 1975 साली 1.3 कोटी रुपयांच्या (आजचा विचार केल्यास 37 कोटींच्या) बजेटमध्ये बनवलेला चित्रपट होता. या चित्रपटाने तब्बल 7.5 कोटी रुपये (आताच्या काळात 211 कोटींच्या आसपास) कमाई केली. हा चित्रपट एक अॅक्शन क्राइम प्रकारचा होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केलं होतं. तर कथा सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी लिहिली होती.  

9/9

big b amitabh bachchan movie more than 3 crore tickets sold

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार अमिताभ यांची प्रमुख भूमिका असलेला 'दीवार' चित्रपट 100 आठवड्यांहून अधिक काळ चित्रपटगृहांमध्ये झळकत होता. या चित्रपटाने कमाईसंदर्भात अनेकांना मागे टाकलं. 1975 साली अमिताभ यांच्यासाठी फारच उत्तम ठरलं. याच वर्षी त्यांचा 'शोले' चित्रपट प्रदर्शित झाला होता.