Interesting Facts : 12 म्हणजेच एक डझन असं का, 10 किंवा 13 का नाही? कारण वाचून व्हाल हैराण

Interesting Facts : केळी, अंडी, स्टीलची भांडी अशा अनेक गोष्टी या डझनमध्ये खरेदी केल्या जातात. म्हणेज अंडी किंवा केळी विकत घेताताना एक डझन म्हटलं की 12 या संख्येत दिल्या जातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? 12 या संख्येत का देतात? 10 किंवा 13 का देत नाहीत...

May 25, 2023, 15:19 PM IST
1/6

Interesting Facts

तुम्ही एखादी वस्तू एक डझनच्या हिशोबाने खरेदी करताना, बारा या संख्येचे का देतात? म्हणजे, एक डझन म्हणजे 10 किंवा 15 गोष्टी या संख्येत का देत नाही? मग 12 चा आकडा कसा काय ठरला?   

2/6

Interesting Facts

उदाहरणार्थ, एक डझनमध्ये केळी किंवा अंडी देण्यामागे दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे की ड्युओडिमिकल स्टिटीम ऑफ काउंटिंग.   

3/6

Interesting Facts

जुन्या काळात लोक गोष्टींची गणना करण्यासाठी अवयवांचा वापर करायचे. जसे की बोटं. अंगठा सोडून जर तुम्ही चार बोटांमधील जॉइंट्स मोजले तर ही संख्या 12 अशी होते. त्यामुळेच मोजण्यास सोपे व्हावे म्हणून 12 या संख्येने मोजण्याची सुरुवात झाली. 

4/6

Interesting Facts

दुसरे म्हणजे 12 अंक विभागण्यासाठी सोपा असून जसे की केळयाचा घड जर दोन गटात विभागायचा असेल तर 6-6, तीनमध्ये विभागणी करायची तर 4-4-4, आणि चार भागात विभागणी करायची तर 3-3-3 अशी गणना करता येते.  

5/6

Interesting Facts

शिवाय तुम्हाला जर डझनता पाव भाग हवा असेल तर तुम्हाला 3 केळी घेता येतात पण 10 किंवा 15 संख्या असेल तर अडीच किंवा 4.7 अशी मोड करणे कठीण होते. 

6/6

Interesting Facts

ही सोय पाहता डझनमध्ये सुरुवातीपासून 12 या संख्येत वस्तू दिल्या जातात.