जागतिक दुग्ध दिन : दूध उत्पादक शेतकरी मात्र संकटात
खुराकाच्या वाढलेल्या किंमती आणि घसरलेले दुधाचे दर
आज 'जागतिक दूध दिन साजरा करण्यात येत आहे, पण सध्या दूध उत्पादक शेतकरी मात्र संकटात सापडला आहे. देशात, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचा परिणाम सर्वच उद्योगांवर दिसून आला. या लटकडाऊनचा फटका दूध व्यवसायाला देखील मोठ्या प्रमाणात बसला. लॉकडाऊन पूर्वी ३२ रूपये लिटर असलेल्या दुधाची किंमत २० ते २२ रूपये लिटरवर आली आहे. शिवाय खुराकाच्या वाढलेल्या किंमती आणि घसरलेले दुधाचे दर यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याची मागणी या दुग्ध उत्पादन शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे.