IPL 2021: 5 खेळाडू IPLची ट्रॉफी मिळवण्यासाठी मोलाचे, दिल्ली कॅपिटल्सकडून वाढल्या अपेक्षा

यंदाच्या IPLमध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये दोन मोठे धक्के IPLआधी मिळाले आहेत. श्रेयस अय्यरची दुखापत आणि दुसरं नुकतच अक्षर पटेलला झालेला कोरोना. यामुळे ऋषभ पंतचं टेन्शन वाढलं आहे. असं असलं तरी देखील यंदा दिल्ली कॅपिटल्स संघ ट्रॉफी मिळवू शकतो. कारण संघात 5 तगडे आणि दमदार खेळाडू आहेत. हे खेळाडू कोणत्याही क्षणी बाजी पलटवू शकतात त्यामुळे सर्वांचं लक्ष दिल्ली कॅपिटल्सकडे आहे. यावेळी ऋषभ पंत कसं नियोजन करतो हे देखील सर्वांसाठी कुतूहल असणार आहे.

Apr 04, 2021, 08:28 AM IST
1/5

कगिसो रबाडा

कगिसो रबाडा

दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा जगातला सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणारा गोलंदाज मानला जातो. आजच्या घडीला त्याच्या गोलंदाजीनं भल्याभल्यांच्या मैदानात दांड्या गुल करण्यात तो माहीर असल्यानं तो IPLमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून गेमचेंजर ठरू शकतो. मागच्या सीजनमध्ये त्याने 30 विकेट्स घेतल्या होत्या.

2/5

एनरिच नॉर्टजे

एनरिच नॉर्टजे

रबाडाचा साथीदारच म्हणता येईल. मागच्या हंगामात या गोलंदाजानं मैदान हादरून सोडलं होतं. नॉर्टजच्या गोलंदाजीचा वेग आणि त्याची शैली यासमोर फलंदाजांनाही नमतं घ्यावं लागतं. यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघातून तो खेळत असल्यानं त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. 

3/5

स्टीव्ह स्मिथ

स्टीव्ह स्मिथ

सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज स्टीव्ह स्मिथचा यावर्षी दिल्लीच्या संघात समावेश करण्यात आला आहे. आयपीएल 2021 च्या आधी स्मिथला राजस्थान रॉयल्स संघानं रिलीज केलं होतं. दिल्लीला संघाला विजयापर्यंत पोहोचवण्याच्या प्रवासात त्याचा मोलाचा वाटा असू शकतो त्यामुळे सर्वांच्या नजरा या स्टीव स्मिथकडे आहेत. 

4/5

मार्कस स्टोइनिस

मार्कस स्टोइनिस

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टोइनिसही दिल्लीला जेतेपद पटकावण्यात मोलाची भूमिका बजावू शकतो. मार्कस स्टोइनिस ऑलाराउंडर असल्यानं फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीसाठी त्याची कामगिरी मोलाची ठरू शकते. 

5/5

ऋषभ पंत

ऋषभ पंत

दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला झालेल्या दुखापतीमुळे दिल्ली संघाने पंतला यंदा संघाचा कर्णधार म्हणून नेमले आहे. पंतच्या खेळाविषयी संपूर्ण जगाला माहिती आहे. पंत फलंदाजीसह वेगवान डाव खेळण्यासाठी ओळखला जातो. इतकेच नाही तर पंत सध्या याक्षणी सर्वोत्तम फॉर्ममध्येही आहे. याचा फायदा संघाला होणार आहे.