IPL 2023 : आयपीएलच्या चार सामन्यात 294 डॉट बॉल, बीसीसीआय देशभरात लावणार 'इतकी' झाडं

IPL 2023 : आयपीएलच्या क्वालिफायर सामन्यात बीसीसाआयने (BCCI) एक कौतुकस्पद उपक्रम राबवला होता. क्लालिफायर ते फायनलपर्यंतच्या (IPL Final) प्रत्येक सामन्यात जितके डॉट बॉल (Dot Ball) टाकले जातील त्या प्रत्येक डॉट बॉलमागे 500 झाडं (Tree) लावण्यात येणार आहेत. यासाठी बीसीसीआयने टाटाक ग्रुपशी (Tata Group) हातमिळवणी केली आहे. आता आयपीएल स्पर्धा संपली आहे आणि क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती यंदाच्या आयपीएल (IPL 2023) हंगामात एकूण किती डॉट बॉल टाकले गेले आणि बीसीसीआय किती झाडं लावणार आहे. 

| May 31, 2023, 21:45 PM IST
1/6

झाडं लावा, झाडं वाचवा या उपक्रमांतर्गत बीसीसीआयने प्लेऑफ मधल्या प्रत्येक सामन्यात टाकण्यात आलेल्या डॉट बॉलमागे 500 झाडं लावण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा ग्रुपच्या पुढाकाराने हा उपक्रम राबला जात आहे. 

2/6

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात प्लेऑफमध्ये तब्बल 294 डॉट बॉल टाकण्यात आले. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय आणि टाटा ग्रुप देशभरात 1 लाख 47 हजार झाडं लावणार आहेत.

3/6

आयपीएल प्लेऑफ 2023 मध्ये 4 सामने खेळले गेले.  23 मे 2023 रोजी चेन्नई विरुद्ध गुजरातच्या सामन्यात 84 डॅाट बॉल टाकले गेले. त्यानुसर 42 हजार झाडे लावली जातील

4/6

आयपीएल प्लेऑफ 2023 चा दुसरा सामना मुंबई विरुद्ध लखनऊदरम्यान खेळला गेला. या सामन्यात 96 डॅाट बॉल टाकण्यात आले, त्यानुसार 48 हजार झाडे लावली जातील. या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज आकाश मधवालने तब्बल 17 डॅाट बॉल टाकले.

5/6

प्लेऑफच्या तिसर्‍या सामन्यावर 33,500 झाडे लावण्यात येतील. कारण या सामन्यात  67 डॉट बॉल पडले आहेत. हा सामना मुंबई विरुद्ध गुजरातदरम्यान रंगला. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना  खेळला गेला.

6/6

आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये 45 डॉट बॉल्सनुसार 22,500 झाडे लावली जातील, अंतिम सामना चेन्नई विरुद्ध गुजरातमध्ये खेळला गेला, हा सामना चेन्नई सुपर किंग्सने जिंकला आणि 2023 चा चॅम्पियन संघ बनला.