IPL 2023 : सामना हरत असतानाही धोनी फलंदाजीला का येत नाही? कोचने केला मोठा खुलासा

MS Dhoni : आयपीएलचं (IPL 2023) चारवेळा जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला (CSK) यंदाच्या हंगामात तिसरा पराभव स्विकारावा लागला. राजस्थान रॉयल्सने (RR) जयपूरमध्ये चेन्नईला धूळ चारली. चाहत्यांनी याचा राग माहिवर काढला आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनी (MS Dhoni) सहा विकेट गेल्यानंतरही फलंदाजीला उतरला नाही. संघाचा पराभव होत असतानाही धोणी पॅव्हेलिअनमध्ये बसला होता. यावरुन आता चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर संघाच्या प्रशिक्षकांनी अखेर खुलासा केला आहे.

| Apr 29, 2023, 22:47 PM IST
1/7

महेंद्र सिंग धोणीचं नाव जगातील दिग्गज क्रिकेटर्समध्ये घेतलं जातं. धोणीच्या नेतृत्वात भारताने दोन वर्ल्ड कप जिंकले आहेत. तर आयपीएलमध्ये धोणीने चेन्नई सुपर किंग्सला तब्बाल चारवेळा जेतेपद पटकावून दिलं आहे. 

2/7

भारतीय संघात खेळताना धोणी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत होता. आयपीएलमध्येही त्याने हा क्रमांक कायम ठेवला होता. पण गेल्या काही सामन्यात धोणी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येतोय.

3/7

जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडिअममध्ये गुरुवारी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान गुरुवारी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईला 32 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर चेन्नईच्या चाहत्यांचा राग अनावर झाला. त्यांचा राग होता तो कर्णधार महेंद्र सिंग धोणीवर.

4/7

चेन्नई पराभवाच्या संकटात असताना धोणी डग आऊटमध्ये बसला होता. त्यामुळे संघाला गरज असताना धोणी फलंदाजीला का उतरला नाही असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला आहे. 

5/7

यंदाच्या हंगामात धोणी सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत असल्याचं पाहिला मिळतंय. पण तोपर्यंत सामना हातातून निसटलेला असतो. यावर प्रशिक्षक ड्वेन ब्राव्होने खुलासा केला आहे. 

6/7

चेन्नईच्या संघात अंबाती रायडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा सारखे युवा आणि आक्रमक फलंदाज आहेत. त्यांना फलंदाजीची जास्तीत जास्त संधी मिळणं गरजेचं आहे. शिवाय धोणी हा बेस्ट फिनिशर आहे त्यामुळे तो तळाला फलंदाजीला येतो असं ब्राव्होने म्हटलंय. 

7/7

आयपीएल पॉईंटटेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्स चौथ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने आठ सामन्यांपैकी पाच सामन्यात 5 विजय मिळवत 10 पॉईंट मिळवलेत. गुजरात टायटन्स 12 पॉईंटसह पहिल्या क्रमांकावर आहे.