IPL 2023 : रिंकू सिंगमुळे आजारी पडला 'हा' खेळाडू; जाणून घ्या नेमंक काय घडलं?

IPL 2023 : आयपीएल या स्पर्धेतून अनेक प्रतिभावान खेळाडू उदयाला येत असतात. अशातच कोलकाताचा रिंकू सिंगही एका सामन्यातील दमदार कामगिरीमुळे चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. तर दुसरीकडे  ज्याच्या षटकामध्ये त्याने पाच षटकार ठोकले होते तो यश दयाल सध्या आयपीएलपासून दूर असल्याचे पाहायला मिळत आहे.

Apr 27, 2023, 19:33 PM IST
1/7

rinku singh 5 sixes

इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 9 एप्रिलच्या सामन्यात रिंकू सिंगने (rinku singh) शेवटच्या षटकात पाच चेंडूवर पाच षटकार मारुन कोलकाताला सामना जिंकून दिला. डावखुरा फलंदाज रिंकू सिंगने सामन्याच्या शेवटच्या षटकात असा काही अप्रतिम खेळ दाखवला त्याचे कौतुक करायला शब्द कमी पडले आहेत.

2/7

yash dayal vs rinku singh

गुजरात टायटन्सच्या यश दयालच्या (yash dayal) शेवटच्या षटकात रिंकू सिंगने चांगलीच धुलाई केली होती. महत्त्वाच्या षटकात  शेवटच्या यश दयालने 31 धावा दिल्या होत्या. सामन्यानंतर त्याच्यावर टीकाही करण्यात येत होती. 

3/7

reason for the absence of yash dayal

मात्र या सामन्यानंतर यश मैदानावर दिसलेला नाही. पुढच्याच सामन्यात यशचे नाव प्लेईंग 11 मध्येही दिसला नाही. खराब खेळीमुळे त्याला बसवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मात्र आता यशच्या अनुपस्थितीचे कारण गुजरातच्या कर्णधाराने सांगितलं आहे.

4/7

hardik pandya on yash dayal

माध्यमांच्या वृत्तानुसार, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने यशच्या अनुपस्थितीचे कारण सांगितले आहे. 25 एप्रिलला गुजरात आणि मुंबई यांच्यात झालेल्या मॅचनंतर हार्दिकला स्टार स्पोर्ट्सवर यश दयालबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. 

5/7

yash dayal health update

"कोलकातानंतरच्या सामन्यापासून यश आजारी आहे. दहा दिवसांत यशचे सात ते आठ किलो वजन कमी झाले आहे. त्यामुळे सध्या तो क्रिकेट खेळण्याच्या स्थितीत नाही. त्याला मैदानात परतण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. मात्र, परतण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. पण तो मैदानात कधी परतेल हे मी सांगू शकत नाही," असे हार्दिकने म्हटलं आहे.

6/7

yash dayal in UP Team

डावखुरा गोलंदाज यश दयाल उत्तर प्रदेशकडून खेळतो. यशने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. 17 सामन्यांमध्ये त्याने 58 विकेट घेतल्या आहेत. टी-20 सामन्यातही यशने 33 विकेट घेतल्या आहेत. यशने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्वही केले आहे. 

7/7

yash dayal in ipl auction

2021-22 च्या विजय हजारे षटकाच्या मोसमात सर्वाधीक विकेट घेण्याऱ्यांच्या यादीत आहे. 2022 मध्ये झालेल्या लिलावात गुजरात टायटन्सने यश दयालला 3.2 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.