'वीस किलो वजन कमी कर, संघात घेतो' 'या' खेळाडूचा एमएस धोनीबाबत मोठा खुलासा

MS Dhoni to Shahzad : भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत महेंद्रसिंग धोनीचं नाव पहिल्या क्रमांकावर येतं. आयपीएलमध्येही धोनीच्या नावावर विक्रमी कामगिरी आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने तब्बल पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. 

| Dec 08, 2023, 17:46 PM IST
1/7

आयपीएलमध्य सर्वाधिक जेतेपद पटकाणाऱ्या संघात एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा समावेश आहे. सीएसकेने तब्बल पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे.

2/7

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. आता अफगाणिस्तानच्या एका खेळाडूने धोनीबाबत मोठा खुलासा केला आहे. 

3/7

वयाच्या 40 वर्षातही धोनीचा फिटनेस तरुणांना लाजवणारा आहे. संघातील खेळाडूंचाही फिटनेस तसाच असावा यासाठी तो आग्रही असतो. प्रसंगी खेळाडूंना ओरडतोही.

4/7

अफगाणिस्ताना संघाचा माजी कर्णधार असगर अफगानने धोनीबाबत एक खुलासा केला आहे. वीस किलो वजन कमी केल्यास मोहम्मद शहजादला चेन्नई सुपर किंग्समध्ये घेईन असं धोनीने आपल्याला सांगितल्याचं असगरने म्हटलंय.

5/7

2018 एशिया कपदरम्यान ही गोष्ट घडली होती. या स्पर्धेत भारत-अफगाणिस्तानदरम्यानचा सामना टाय झाला होता. या सामन्यात मोहम्मद शहजादने 116 चेंडूत 124 धावा केल्य होत्या.  सामन्यानंतर धोनी आणि असगर अफगान यांच्यात चर्चा झाली होती.

6/7

मोहम्मद शहजादने धोनीला तुझा मोठा फॅन असल्याचं सांगितलं. यावर धोनीने शहजादला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. 20 किलो वजन कमी केलं तर तुला सीएसकेमध्ये घेईन असं धोनीने त्याला सांगितलं.

7/7

एका मुलाखतीत असगर अफगाणने हा खुलासा केला आहे. धोनी एक जबरदस्त कर्णधार असून भारतीय क्रिकेटला मिळालेलं एक वरदान असल्याचंही असगरने सांगितलं.