ईशान किशन दिसला सुपरमॅन अवतारात, मुंबई इंडियन्सचा 'हा' भन्नाट नियम तुम्हाला माहित आहे का?

Super Man Ishan Kishan : आयपीएलच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक झाली आहे. पहिल्या तीनही सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. आता मुंबई इंडियन्सचा चौथा सामना 7 एप्रिलला खेळवला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावरच खेळवला जाणार आहे. यादरम्यान ईशान किशनसह मुंबईचे चार खेळाडू चक्क सुपरमॅन अवतारात दिसले.

| Apr 03, 2024, 14:42 PM IST

Super Man Ishan Kishan : आयपीएलच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक झाली आहे. पहिल्या तीनही सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. आता मुंबई इंडियन्सचा चौथा सामना 7 एप्रिलला खेळवला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावरच खेळवला जाणार आहे. यादरम्यान ईशान किशनसह मुंबईचे चार खेळाडू चक्क सुपरमॅन अवतारात दिसले.

1/7

आयपीएलमध्ये पाचवेळा विजेत्या मुंबई इंडियन्ससाठी सतराव्या हंगामाची सुरुवात निराशाजनक झाली आहे. मुंबई इंडियन्सला सलग तीन सामन्यात पराभव पत्करावा लागलाय. तिसऱ्या सामन्यात तर राजस्थान रॉयल्सने मुंबईला घरात घुसून हरवलं. 

2/7

सलग तीन पराभवामुळे मुंबई इंडियन्स पॉईंटटेबलमध्ये तळाला म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहे. मुंबईचा चौथा सामना आता 7 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सशी रंगणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे.

3/7

मुंबई इंडियन्सचा तिसरा सामना एक एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध झाला. त्यानंतर चौथ्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सला तब्बल सहा दिवसांचा वेळ मिळाला आहे. यावेळेत मुंबई इंडियन्सचा संघ जामनगरला रवान झाला. यावेळी विमातळार ईशान किशनसह मुंबईच्या तीन खेळाडूंचा अवतार पाहून चाहतेही हैराण झाले.

4/7

मुंबई इंडियन्सचा विकेटकिपर-फलंदाज ईशान किशन चक्क सुपरमॅनच्या कॉस्च्यूममध्ये दिसला. मुंबई इंडियन्सने याचा एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. ईशान किशनबरोबरच कुमार कार्तिकेय, शम्स मुलानी आणि नुवान तुषारादेखील सुपरमॅनच्या पोषाखात दिसले.  

5/7

इतर खेळाडू मुंबई इंडियन्सच्या जर्सी असताना या चार खेळाडूंनाच सुपरमॅनचा पोषाख का देण्यात आला असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. यामागे मुंबई इंडियन्सचा एक भन्नाट नियम आहे. हा पोषाख मजा म्हणून नाही तर शिक्षा म्हणून या खेळाडूंना देण्यात आला होता.

6/7

मुंबई इंडियन्समध्ये एक नियम आहे आणि तो कठोरपणे पाळला जातो. संघाच्या बैठकीला उशीराने पोहोचणाऱ्या खेळाडूंना शिक्षा दिली जाते. शिक्षा म्हणून पूर्ण प्रवासात उशीरा आलेल्या खेळाडूंना सुपरमॅनचा पोषाख परिधान करावा लागतो. 

7/7

त्यामुळेच ईशान किशन,  कुमार कार्तिकेय, शम्स मुलानी आणि नुवान तुषाराला असा पोषाख करुन प्रवास करावा लागला. मुंबई इंडियन्स हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. मुंबईकर चाहत्यांनी व्हिडिओवर या चौघांची चांगलीच फिरकी घेतलीय.