IPL 2024 : दिल्लीविरुद्ध मुंबईने रचली रेकॉर्ड्सची गाथा, पाहा कोणते रेकॉर्ड रचले
आयपीएल 2024 च्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या 20 व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून मुंबईच्या संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांच्या फडशा पाडत 20 ओव्हरमध्ये तब्बल 234 धावांचा डोंगर दिल्लीसमोर ऊभा केला आणि प्रत्युत्तरात दिल्ली या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यात अयशस्वी ठरली. पण जिंकण्यासोबतच मुंबई इंडियन्सने या सामन्यात अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहे.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/08/726202-2.png)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/08/726201-1.png)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/08/726200-3.png)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/08/726199-4.png)
रोमारिओ शेपर्ड आणि टीम डेविडच्या दमदार भागीदारीमुळे मुंबईने 16 व्या ओव्हरीत 12, 17 व्या ओव्हरीत 17, 18 व्या ओव्हरीत 16, 19 व्या ओव्हरीत 19 , तर 20 व्या ओव्हरीत चक्क 32 धावा काढल्या होत्या. तर डेथ ओव्हर्समध्ये सर्वात जास्त धावा बनवण्याच्या लिस्टमध्ये 96 धावा बनवण्याचा रेकॉर्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीने 2016 मध्ये गुजरात लायन्सविरूद्ध डेथ ओव्हर्समध्ये तब्बल 112 धावा झोडल्या होत्या.
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/08/726197-5.png)
आयपीएलच्या 20 व्या मॅचनंतर मुंबईने आयपीएलच्या एका टीमविरूद्ध सर्वात जास्त वेळेस 200 धावा बनवण्याचा रेकॉर्डसुद्धा आपल्या नावावर केला आहे. या रेकॉर्डसोबत मुंबईने आरसीबीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. आरसीबीने पंजाब किंग्सविरूद्ध सहा वेळेस 200 हून जास्त धावा बनवल्या, तर आता मुंबईनेसुद्धा दिल्लीविरूद्ध सहा वेळेस 200 हून अधिक धावा बनवल्या आहेत.
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/08/726195-6.png)