आयपीएल मेगा ऑक्शनची तारीख आली समोर, कुठे आणि कधी होणार आयोजन?

IPL 2025 Mega Auction Date: इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी टी 20  लीगपैकी एक असून लवकरच याच्या 18 व्या सीजनसाठी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. मेगा ऑक्शनपूर्वी आयपीएलच्या सर्व 10 फ्रेंचायझींना त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट 31 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करायची आहे. आयपीएल ऑक्शनची चर्चा सुरु असताना त्याची तारीख आणि ठिकाण याबाबत माहिती सुद्धा समोर आली आहे. 

Pooja Pawar | Oct 17, 2024, 15:34 PM IST
1/6

आयपीएल 2025 मेगा ऑक्शनसाठी आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने काही नियम जाहीर केले आहेत. यानुसार प्रत्येक फ्रेंचायझी त्यांच्या संघातील जास्तीत जास्त 6 खेळाडूंना रिटेन करू शकतात. तसेच 2018 च्या ऑक्शनमध्ये लागू करण्यात आलेला RTM कार्ड (राइट टू मॅच) नियम हा यंदाच्या मेगा ऑक्शनसाठी सुद्धा लागू असेल. यासह अनेक नियम लागू करण्यात आले आहेत.   

2/6

समोर येत असलेल्या मीडिया रिपोर्टनुसार आयपीएल 2025 साठीचं मेगा ऑस्कन हे  24 किंवा 25 नोव्हेंबर रोजी आयोजित केलं जाऊ शकत. स्पोर्ट्स स्टारने दिलेल्या माहितीनुसार यंदाचं मेगा ऑक्शन हे सौदी अरेबीरियाची राजधानी रियाद येथे होऊ शकतं. मात्र अद्याप बीसीसीआयने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.   

3/6

आयपीएल 2024 पूर्वी झालेलं मिनी ऑक्शनचे आयोजन सुद्धा दुबईत झालं होतं. परंतु यावेळी सौदी अरेबीरियाची राजधानी रियाद याला बीसीसीआय आयपीएल ऑक्शन आयोजित करण्यासाठी पसंती देऊ शकते. बीसीसीआय मेगा ऑक्शनसाठी लंडन आणि सिंगापूरबाबत सुद्धा विचार करत होती मात्र स्पोर्ट्स स्टारच्या माहितीनुसार रियाद हे शहर मेगा ऑक्शनच्या आयोजनासाठी निश्चित करण्यात आलेले आहे. 

4/6

सौदी अरेबीरियाची राजधानी असलेल्या रियादचा टाइम झोन हा भारताच्या टाइम झोननुसार ठीक मानला जातो. यामुळे मेगा ऑक्शनच्या ब्रॉडकास्टसाठी सुद्धा हे सोयीस्कर पडेल. लिलावाचे ठिकाण सध्या तयार केले जात असून याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सर्व 10 फ्रँचायझींचे संबंधित अधिकारी मेगा ऑक्शनसाठी रियाधला पोहोचतील. तसेच त्यांच्यासोबत जिओ आणि स्टार स्पोर्ट्सची एक मोठी टीमही जाणार आहे. लिलाव जिओ आणि स्टारवर थेट प्रसारित केला जाऊ शकतो.

5/6

आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी 31 ऑक्टोबर पर्यंत सर्व फ्रेंचायझींना त्यांची रिटेन्शन लिस्ट जाहीर करावी लागणार आहे. फ्रेंचायझींच्या रिटेन्शन लिस्टकडे सर्वांचं लक्ष असून यंदा दिग्गज खेळाडू ऑक्शनमध्ये येऊ शकतात आणि त्यांच्यावर मोठी बोली लागू शकते. 

6/6

मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिटेन करणार का याबाबत अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगतायत. अशा परिस्थितीत इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार आयपीएल 2025  साठी रोहित शर्माला मुंबई इंडियन्स रिटेन करू शकते. यासह मुंबईच्या रिटेन खेळाडूंच्या लिस्टमध्ये हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहचा समावेश असू शकतो.