IPL : 'किंग्स इलेवन पंजाब'ने बदललं संघाचं नाव आणि Logo

Feb 17, 2021, 18:18 PM IST
1/6

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सीजनपूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आपले नाव बदलले आहे. या टीमने बुधवारी आपला नवीन लोगो जाहीर केला. टीमचा नवा लोगो चाहत्यांना आवडत आहे. सोशल मीडियावर त्याला खूपच पसंती मिळत आहे. सोमवारीच किंग्ज इलेव्हन पंजाबने जाहीर केले होते की नवीन हंगामात ही टीम नव्या नावाने खेळेल.

2/6

आयपीएलच्या नव्या मोसमात पंजाबची टीम किंग्ज इलेव्हन पंजाब ऐवजी पंजाब किंग्जच्या नावाने खेळणार आहे. या टीमचा नवा लोगो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा लोगो अजून अधिकृत अकाऊंडवर जाहीर झालेला नाही. आयपीएल अधिकृतकडून ही अजून याबाबत माहिती दिली गेलेली नाही.

3/6

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर बुधवारी एक ट्विट केले गेले आहे. ज्यामध्ये लिहिले गेले आहे की, हे आमचे शेवटचे ट्विट आहे, धन्यवाद ट्विटर आणि फॅन.

4/6

आतापर्यंत जेतेपद न जिंकू शकलेल्या टीममध्ये पंजाब संघ देखील आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटलने अजून एकदाही IPL कप जिंकलेला नाही.

5/6

दिल्ली कॅपिटल आणि रॉयल चॅलेंजर्सच्या संघांनीही त्यांचा लोगो याआधी बदलला आहे. आता पंजाब संघ नवीन लोगो आणि नावासह सह मैदानावर उतरणार आहे. 

6/6

चाहत्यांनी ट्विटरवर पंजाब किंग्जच्या नावावर ट्वीट सुरू केले आहे. ज्यात टीमचा नवीन लोगो आहे. हा लोगो सतत ट्विट केला जात आहे.