लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवणे चूक की बरोबर? वैवाहिक आयुष्यावर याचा परिणाम होतो का?

लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? लग्नानंतर याचा वैवाहिक नातेसंबंधावर कशा प्रकारे परिणाम होतो जाणून घेऊया.

Jul 28, 2023, 21:31 PM IST

Physical Relations: लैंगिक संबंध ही प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील अत्यंत खाजगी बाब आहे. भारतीय संस्कृतीत लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवणे गैर मानले जाते. मात्र, सध्या अनेकजण  लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवतात. लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवणे चूक की बरोबर यावरुन अनेक मतभेद आहेत. लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवल्यास त्याचा वैवाहिक आयुष्यावर काय परिणाम होतो याबाबत देखील वेगवेगळे मत प्रवाह आहेत.

1/7

अनेकजण सध्या living relationship मध्ये राहतात. अशातच लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवणे चूक की बरोबर यावर मतभेद आहेत. अनेकांना हे योग्य वाटते तर अनेकांना अयोग्य. 

2/7

लग्नाच्या आधी लैंगिक संबंध ठेवल्यास आवडी निवडी तसेच सवयी आधीच माहित असल्यामुळे वैवाहिक आयुष्य आणखी चांगले होते असे अनेकांना वाटते. 

3/7

लग्नाआधी ज्या व्यक्तीसह लैंगिक सबंध ठेवले त्याच्यासह विवाह न झाल्यास मनात अपराधीपणाची भावना राहते. ज्या व्यक्तीशी विवाह झाला त्याला लग्नाआधी झालेल्या लैंगिक सबंधांबाबत समजल्यास अविश्वास निर्माण होवू शकतो अशी भिती अनेकांना वाटते.

4/7

लग्नाच्या आधी लैंगिक संबंध ठेवल्यास नाते आणखी घट्ट होते. लग्नाआधी अनेक गोष्टी समजल्यामुळे भविष्यात वाद विवाद होणार नाहीत असे अनेकांना वाटते.

5/7

अनेकांना लग्नाच्या आधी लैंगिक संबंध बरोबर वाटते.

6/7

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर लग्न तुटल्यास अनेकांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. विशेषत: महिलासांठी मूव्ह ऑन करणे खूप कठिण असते.

7/7

अनेकांच्या मते लग्नाच्या आधी लैंगिक संबंध ठेवणे चूक आहे.