ताजमहालामध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाले नेतन्याहू!

Jan 16, 2018, 22:46 PM IST
1/7

ताजमहालामध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाले नेतन्याहू!

ताजमहालामध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाले नेतन्याहू!

प्रेमाची निशाणी असलेल्या ताजमहालामध्ये पोहोचल्यावर इज्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा रोमँटिक झालेले पाहायला मिळाले. या दोघांनी ताजमहालासमोर उभं राहून फोटो काढले. बेंजामिन नेतन्याहूंसोबत ताजमहाल पाहिल्यावर सारा चांगल्याच खुश दिसल्या. 

2/7

ताजमहालामध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाले नेतन्याहू!

ताजमहालामध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाले नेतन्याहू!

पांढऱ्या शुभ्र संगमरवरापासून बनवलेला ताजमहाल पाहण्यासाठी नेतन्याहूंनी निळ्या रंगाचा सूट तर सारानी लाल रंगाचा ड्रेस घातला होता. 

3/7

ताजमहालामध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाले नेतन्याहू!

ताजमहालामध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाले नेतन्याहू!

भारत दौऱ्यावर आलेल्या इज्रायलच्या पंतप्रधानांनी मंगळवारी ताजमहालाला जाऊन भेट दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नेतन्याहूंचं स्वागत केलं. 

4/7

ताजमहालामध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाले नेतन्याहू!

ताजमहालामध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाले नेतन्याहू!

बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारानं ताजमहालच्या 'डायना बेंच'वर फोटो काढले. या दोघांनी ताजमहालाचा कानाकोपरा पालथा घातला. 

5/7

ताजमहालामध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाले नेतन्याहू!

ताजमहालामध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाले नेतन्याहू!

आग्र्यामध्ये ताजमहाल पाहण्यासाठी नेतन्याहू पत्नीसोबत विशेष विमानानी आग्र्याच्या खेरिया विमानतळावर पोहोचले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलं. 

6/7

ताजमहालामध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाले नेतन्याहू!

ताजमहालामध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाले नेतन्याहू!

ताजमहालामध्ये पोहोचायच्याआधी ब्रज लोक कलाकारांनीही नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नीचं स्वागत केलं. नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नीनं ब्रज लोक कलाकारांसोबत फोटोही काढले. यानंतर बेंजामिन आणि त्यांच्या पत्नीनं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत हॉटेलमध्ये दुपारी जेवण केलं. जेवणानंतर नेतन्याहू दांपत्य ताजमहालात बॅटरीनं चालणाऱ्या गाडीनं पोहोचले. 

7/7

ताजमहालामध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाले नेतन्याहू!

ताजमहालामध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाले नेतन्याहू!

इज्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या ताजमहाल दौऱ्यावेळी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.