ज्या वयात 10 वीची परीक्षा निघत नाही, त्या वयात युवा नेत्या होत्या मेलोनी

इटली दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली होती. त्यावेळी मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना भारतीय पद्धतीने नमस्कार करत इटलीमध्ये स्वागत केलं होतं.  संमेलनात मेलोनी यांनी मोदींसोबत घेतलेले सेल्फी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Jun 15, 2024, 14:31 PM IST
1/8

इटलीत झालेल्या जी-7 शिखर संमेलनात मेलोनी यांनी भारतीय पद्धतीने हात जोडून मोदींना अभिवादन करतानाच्या फोटोंमुळे त्यांची भारतात चर्चा होत आहे. 

2/8

जॉर्जिया मेलोनी यांनी जी-7 शिखर संमेलनातला मोदींसोबतचा व्हिडाओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ काही वेळातच तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये मोलोनी यांनी #Melody दिलेला हॅशटॅग सध्या ट्रेंडींग आहे.   

3/8

जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान म्हणून मेलोनी यांना ओळखलं जात असलं तरी इथपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता.

4/8

वयाच्या 47 व्या वर्षी देशाचं पंतप्रधान पद स्विकारणाऱ्या जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्या नेतृत्वकौशल्याने आणि बेधडक वृत्तीमुळे संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं.   

5/8

मेलोनी वयाच्या 15 व्या वर्षी युवा नेत्या, 19 व्या वर्षी राष्ट्रीय नेत्या, तर 31 वर्षांच्या असताना कॅबिनेट मंत्री होत्या. म्हणूनच इटलीच्या इतिहासात दुसऱ्या सर्वात युवा नेत्या म्हणून त्यांच जगभरात कौतुक केलं जातंय. 

6/8

मेलोनी यांचा जन्म 15 जानेवारी 1977 मध्ये झाला. मेलोनी लहान असतानाच त्यांचे आई वडील विभक्त झाले.  याचा त्यांचा मनावर खोल परिणाम झाला, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

7/8

इटलीच्या या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या त्यांच्या बेधड वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतात. पाश्चिमात्य देशात समलैंगिक विवाहाला संमती दर्शवली जाते, मात्र जॉर्जिया मेलोनी या समलैंगिक विवाहाच्या विरोधात आहेत.   

8/8

जॉर्जिया मेलोनी यांच्या मते, मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी आई वडील दोघांची गरज असते. त्यामुळे समलिंगी जोडप्याला मुल दत्तक देण्यास त्यांचा विरोध आहे.