PHOTO : लहानपणापासून चित्रपटात काम, सुपरस्टारची पत्नी आता खासदार, आज आहे 1578 कोटींची मालकीण

Entertainment News : या चिमुकलीला अभिनेत्री व्हायचं नव्हतं. पण लहानपासूनच चित्रपटात कामाला सुरुवात केली. आज त्या 1578 कोटींची मालकीण आहेत. 

Apr 09, 2024, 11:41 AM IST
1/8

तिच्या अभिनयाची जादू आणि खऱ्या आयुष्यात स्पष्टवक्ते शैलीसाठी ही अभिनेत्री प्रसिद्ध आहे. 1992 मध्ये पद्मश्री पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आलं होतं. वयाच्या 15 वर्षापासून चित्रपटात कामाला सुरुवात केली. 

2/8

सुपरस्टार सोबत लग्न आणि आता खासदार जया बच्चन यांच्याबद्दल आम्ही बोलत आहोत. लहानपणापासून सैन्यात भरती होण्याची इच्छा असताना अभिनेत्री बनली. जया बच्चन यांना सैन्य भरतीमध्ये महिलांना फक्त नर्सचीच नोकरी दिली जायची, पण जया यांना नर्स व्हायचे नव्हतं. 

3/8

मध्य प्रदेशातील जबलपूरमधील बंगाली ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला. सत्यजित रे यांच्या महानगरमधून चित्रपटसृष्टीत त्यांनी प्रेवश केला. हृषिकेश मुखर्जीच्या 'गुड्डी' हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. 

4/8

जया आणि अमिताभ यांची लव्हस्टोरीही एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणेच खूप रंजक आहे हे अनेकांना माहिती आहे. 1973 मधील जंजीर हिट झाला. या यशाचं सेलिब्रेशन जया यांना अमिताभ सोबत लंडनला करायचं होतं. पण अमिताभ यांच्या वडिलांनी लग्न करा आणि मग कुठेही जा अशी शर्त ठेवली. म्हणून अमिताभ आणि जया यांनी घाईघाई लग्न केलं. 

5/8

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, 'सिलसिला' चित्रपटात रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत परवीन बॉबीची निवड झाली होती पण नंतर जया बच्चन यांना घेण्यात आलं. एवंढच नाही तर सिलसिला नंतर जया बच्चन यांनी चित्रपटातून ब्रेक घेतला होता. 

6/8

झालं असं की, सिलसिला या चित्रपटानंतर श्वेता बच्चन नंदा हिने जया यांना म्हटलं की, वडिलांना काम करु दे आणि तू आमच्यासोबत घरी राहा. यानंतर जया यांनी काम न करण्याचा निर्णय घेतला होता. 

7/8

अमिताभ हे जया बच्चन यांच्यासाठी साडी आणायचे, मात्र त्या जया बच्चन यांना आवडायच्या नाहीत. बहुतेक साड्या जांभळ्या रंगाची काठ आणि पांढऱ्या रंगाच्या असायच्या. ज्या त्यांना शोभत नाही असं जया यांना वाटायचं. अमिताभ यांना वाईट वाटू नये म्हणून त्या नेसायच्या. त्या साड्या जया खास करुन चित्रपटात नेसायच्या. 'तेरी बिंदिया रे' गाण्यात त्यांनी ती साडी नेसली होती. 

8/8

जया बच्चन यांच्या नेट वर्थबद्दल बोलायचं झालं तर 57 हजार 507 रुपये रोख, तर त्यांच्या बँक खात्यात 10 कोटी 11 लाख 33 हजार 172 रुपये आहेत. शेअर्स, बाँड्स आणि डिबेंचरमध्ये सुमारे 5 कोटी 18 लाख 57 हजार 928 रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली आहे. अनेक आलिशान गाड्यांसोबत 1 लाख रुपये किमतीची घड्याळे आणि 9 लाख रुपये किमतीचा पेन त्या वापरतात.